NEET विद्यार्थिनीने संपवलं जीवन, लहान बहिणीने दरवाजा उघडताच बसला धक्का
Neet Student Suicide : नीटची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेत जीवन संपवलं. पीडित तरुणी ही तणावात गेली होती. ती कोटा येथे आपल्या धाकट्या बहिणीसोबत नीटचा अभ्यास करत होती, या घटनेनं परिसर हादरून गेला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विद्यार्थिनीने गळफास घेत जीवन संपवलं
कुटुंबियांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली
Neet Student Suicide : नीटची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेत जीवन संपवलं. पीडित तरुणी ही तणावात गेली होती. मृत तरुणीची खुशबू पटेल (वय 20) अशी ओळख समोर आली. मृत विद्यार्थिनी ही मूळची मध्य प्रदेशच्या छतरपुर जिल्ह्यातील रहिवासी असून ती कोटा येथे आपल्या धाकट्या बहिणीसोबत नीटचा अभ्यास करत होती. ही घटना राजस्थानच्या कोटा येथील आहे. दरम्यान, या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला होता.
हे ही वाचा : रक्षाबंधनापूर्वी दोन बहिणींची हत्या, काहीच मिनिटांत खेळ खल्लास
नेमकं काय घडलं?
कुन्हाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी देवेश भारद्वाज यांच्या माहितीनुसार, खुशबू पटेल आणि तिची छोटी बहीण खुशी ही 2023 पासून कोटा येथे राहत होती. तिथे ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास देखील करत होती. खुशबू जेव्हा नीटच्या तयारीसाठी अभ्यास करत होती, तेव्हा तिची धाकटी बहीण तिथेच इंजीनियरिंगच्या JEE ची तयारी करत होती.
गळफास घेत संपवलं जीवन
मंगळवारी सायंकाळी लहान बहीण खुशबू ही आपल्या कोंचिंग क्लासवरून फ्लॅटवर पोहोचली असता, दरवाजा बंद आढळून आला होता. नंतर तिने दरवाजा वाजवण्यास सुरूवात केली होती. भयभीत झालेल्या खुशीने तात्काळपणे आपल्या मैत्रिणीला फोन लावून बोलावले होते, तसेच इतर लोकांना देखील या घटनेची माहिती दिली. नंतर किल्लीच्या मदतीने फ्लॅटचा दरवाजा उघडण्यात आला. दरम्यान, आतील दृश्य पाहून तिच्या पायाखालील जमीन सरकून गेली. खुशबूचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला होता, मात्र डॉक्टरांच्या प्राथमिक तपासातून तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात ठेवला होता. या घटनेची माहिती खुशबूच्या कुटुंबियांना समजली होती.
