प्रेमसंबंधाच्या वादातून महसूल सहाय्यक असलेल्या तरुणीवर कोयत्याचे 8 वार, 2 महिन्यांनी मृत्यू

मुंबई तक

Palghar Crime News : पालघरमध्ये कोयता हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्नेहल सावंत यांचा दोन महिन्यांच्या उपचारानंतर मृत्यू झाला. प्रेमसंबंधातील वादातून झालेल्या या हल्ल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली होती.

ADVERTISEMENT

Palghar Crime News
Palghar Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

प्रेमसंबंधाच्या वादातून महसूल सहाय्यक असलेल्या तरुणीवर कोयत्याचे 8 वार

point

2 महिन्यांनी मृत्यू , नेमकं काय घडलं?

Palghar Crime News, मोहम्मद हुसैन खान :  पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरात 12 जून रोजी झालेल्या कोयता हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्नेहल सावंत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तब्बल दोन महिने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 26 ऑगस्ट रोजी पुण्यातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरातील मुद्रा अपार्टमेंटमध्ये 12 जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास स्नेहल सावंत आपल्या घराकडे जात होत्या. त्याचवेळी त्यांचा प्रेमी अमोल मुळे याने त्यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला.

आरोपीने स्नेहल यांच्या मानेवर  सलग 7 ते 8 वार केले होते. या हल्ल्याची संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली होती. दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, या हल्ल्यानंतर स्नेहल यांनी दोन महिने मृत्यूशी झुंज दिली. दरम्यान, स्नेहलवर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी तीन दिवसांत आरोपी अमोल मुळे यांना अटक केली होती. 

हेही वाचा : भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचा मृत्यू, पण घरात 30 लाखांची रोकड, नेमकं प्रकरण काय?

दोन महिने मृत्यूशी झुंज दिली, अखेर स्नेहलने प्राण सोडले 

कोयता हल्ल्यात स्नेहल सावंत गंभीर जखमी झाल्या होत्या. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जून महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. जवळपास दोन महिने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर बुधवार, 26 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. स्नेहल या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. तर आरोपी अमोल मुळे हा उच्च न्यायालयात काम करत असल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रेमसंबंधातील वादातून हा हल्ला करण्यात आला होता.