भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचा मृत्यू, पण घरात 30 लाखांची रोकड, नेमकं प्रकरण काय?
Crime News : कर्नाटकातील मंड्या येथे भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या घरात 30 लाखांहून अधिक रुपयांची रोकड आढळली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचा मृत्यू
पण घरात 30 लाखांची रोकड, नेमकं प्रकरण काय?
Crime News : कर्नाटकातील मंड्या येथील गुथालू परिसरात एका वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या घरात मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याने स्थानिकांना धक्का बसला आहे. हूर उन्निसा असे या महिलेचे नाव आहे. त्या गुथालू परिसरातील एका भाड्याच्या घरात एकट्याच राहत होत्या. हूर उन्निसा आणि त्यांची बहीण दोघीही अविवाहित होत्या. सुमारे दोन वर्षांपूर्वी बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर हूर उन्निसा एकट्याच राहत होत्या. भीक मागून त्या आपला उदरनिर्वाह करत होत्या.
हेही वाचा : उकळत्या कढईत पडून 25 वर्षीय मजुराचा मृत्यू, युपीच्या कामगाराचा महाराष्ट्रात दुर्दैवी अंत
मृत्यूनंतर घराची पाहणी करण्यासाठी स्थानिक पोहोचले
हूर उन्निसा यांचा रविवारी वयाशी संबंधित आजारांमुळे मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर घराची पाहणी करण्यासाठी स्थानिक नागरिक गेले असता त्यांना घरात पैशांनी भरलेल्या अनेक बॅग आढळून आल्या. स्थानिक समुदायाच्या नेत्यांनी केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, घरात 30 पेक्षा अधिक बॅगमध्ये पैसे ठेवलेले होते. रविवारी सुमारे 8 ते 9 लाख रुपयांची रोकड मोजण्यात आली. मात्र, आणखी सुमारे 20 बॅगमधील रोकड मोजणे बाकी होते.
हेही वाचा : चौकशीतून पेपर फुटल्याचे समोर, MPSC औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; फेरपरीक्षा होणार
