उकळत्या कढईत पडून 25 वर्षीय मजुराचा मृत्यू, युपीच्या कामगाराचा महाराष्ट्रात दुर्दैवी अंत

मुंबई तक

maharashtra jaggery factory boiling jaggery cauldron migrant worker : महाराष्ट्रातील गूळ कारखान्यात उकळत्या गुळाच्या काहिलीत पडून उत्तर प्रदेशातील 25 वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर कुटुंबीयांचा सुरुवातीचा संशय दूर झाला.

ADVERTISEMENT

maharashtra jaggery factory boiling jaggery cauldron migrant worker
maharashtra jaggery factory boiling jaggery cauldron migrant worker
Google CTA

बातम्या हायलाइट

point

उकळत्या कढईत पडून 25 वर्षीय मजुराचा मृत्यू

point

युपीच्या कामगाराचा महाराष्ट्रात दुर्दैवी अंत

maharashtra jaggery factory boiling jaggery cauldron migrant worker : महाराष्ट्रातील एका गूळ कारखान्यात उकळत्या गुळाच्या कढईत पडून उत्तर प्रदेशातील 25 वर्षीय स्थलांतरित मजुराचा मृत्यू झाला. दानिश असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दानिशला वाचवण्यासाठी त्याचे सहकारी मजूर प्रयत्न करताना दिसत आहेत. 21 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. दानिश हा उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील रहिवासी होता. रोजगाराच्या शोधात तो आपल्या 15 मित्रांसह महाराष्ट्रात आला होता. त्यानंतर त्याने एका गूळ कारखान्यात काम स्वीकारले होते.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर प्रकरण : मुरलीधर चांदगुडे काम करत होते, तिथल्या लोकांनी काय खुलासे केले?

कढईत पडल्यानंतर दानिश वेदनेने तडफडला 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये डॅनिश हा गुळाची कढई असलेल्या ठिकाणी उभा असल्याचे दिसते. अचानक तो उघड्या कढईत पडतो. या कढईत उकळता गुळाचा पाक असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. कढईत पडल्यानंतर दानिश वेदनेने तडफडताना दिसतो. त्यानंतर त्याचे सहकारी मजूर त्याला बाहेर काढण्यासाठी धाव घेतात. घटनास्थळी उपलब्ध असलेल्या पळी आणि इतर साहित्याच्या मदतीने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. सुमारे एक मिनिट डॅनिश हा उकळत्या द्रवात राहिल्यानंतर कामगार त्याला बाहेर काढण्यात यशस्वी ठरतात.

हेही वाचा : 'पप्पा, मला सोडून जाऊ नका', कुणालच्या मावशीने आणखी काय सांगितलं?