योजनेच्या पैशांवरून नवरा-बायकोत वाद, पतीनं पत्नीची जीभ तोडली
crime news : मुख्यमंत्री आवास योजनेच्या पैशांवरून नवरा-बायकोमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला. याच वादातून पतीने पत्नीची जीभ दाताने चावून ओढली आणि एका विहिरीत फेकून दिली होती. दारूच्या नशेत नवऱ्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुख्यमंत्री आवास योजनेच्या पैशांवरून नवरा-बायकोमध्ये वाद
नवरा-बायकोच्या वादाला वेगळं वळण
Crime News : मुख्यमंत्री आवास योजनेच्या पैशांवरून नवरा-बायकोमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला. याच वादातून पतीने पत्नीची जीभ दाताने चावून ओढली आणि एका विहिरीत फेकून दिली होती. दारूच्या नशेत नवऱ्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. गंभीररित्या जखमी झालेल्या महिलेचा धनबादच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी आऱोपी नवरा राजेश गोस्वामीला अटक केली. हा प्रकर झारखंडच्या धनबाद येथील असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा : रक्षाबंधनापूर्वी दोन बहिणींची हत्या, काहीच मिनिटांत खेळ खल्लास
मुख्यमंत्री आवास योजनेच्या पैशांवरून नवरा-बायकोमध्ये वाद
पीडितेची बहीण आशादेवीनुसार, मधुचा राजेशसोबत प्रेमविवाह झाला होता. काहीच दिवसांत मधुच्या बँक खात्यात मुख्यमंत्री आवास योजनेचा पहिला हप्ता आला होता. राजेश पैसे मिळवण्यासाठी महिलेवर दबाव आणत होता. मधुने अनेकदा पैसे देण्यास नकार दर्शवला असता, त्यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता, नंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली होती. सासरच्या मंडळींनी तिला वाचवण्याऐवजी तिची बेदम मारहाण केली. यादरम्यान अचानक राजेशने तिच्यावर हल्ला केला आणि दाताने जीभ चावून तोडली आणि विहिरीत फेकून दिली.
नवरा-बायकोच्या वादाला वेगळं वळण
या घटनेदरम्यान पीडितेचा आवाज ऐकून काही लोकांनी घटनास्थळी धाव घेतली, नंतर तिला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी पीडितेची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे सांगितले. कुटुंबियांच्या माहितीनुसार, आधी देखील आर्थिक कारणावरून दोघांमध्ये वाद झाले होते, मात्र वादाने असं वळण घेतलं जाईल याची माहिती नव्हती.
हे ही वाचा : उकळत्या कढईत पडून 25 वर्षीय मजुराचा मृत्यू, युपीच्या कामगाराचा महाराष्ट्रात दुर्दैवी अंत
पोलिसांना या घटनेचा अहवाल मिळताच, पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले, नंतर घटनेची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपी नवरा राजेश गोस्वामीला अटक करण्यात आली. पीडितेच्या कुटुंबियांनी आरोप केला की, सासरचे मंडळी या घटनेत सामील होते, त्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी व्हावी अशी मागणी करण्यात आली.
