'तुमच्या मतदारसंघात जाऊन दाखवा..', संजय राऊतांनी फुटीर खासदारांना दम भरला
Sanjay Raut : शिवसेनेच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांवर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. संबंधित खासदारांना मतदारसंघात जाणे कठीण होईल, असा इशारा त्यांनी दिला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'तुमच्या मतदारसंघात जाऊन दाखवा..',
संजय राऊतांनी फुटीर खासदारांना दम भरला
Sanjay Raut press conference : शिवसेना पक्षाच्या बैठकीला बंडखोर सहा खासदार अनुपस्थित राहिल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. हे खासदार सध्या नेमके कुठे आहेत, त्यांचा ठावठिकाणा काय आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्यांनी म्हटले. काही जण पक्षाच्या बैठकीला आले नाहीत, मात्र ते दुसऱ्या गटासोबतही दिसत नाहीत, असे सांगत त्यांनी या संपूर्ण घडामोडींवर संशय व्यक्त केला. संबंधित खासदार जिल्ह्यात नसल्याची माहिती असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा : Personal Finance: रिडेव्हलपमेंटमध्ये ‘हे’ असतात घरमालकांचे हक्क, अजिबात घेऊ नका माघार..
'रस्त्यावर उतरून लढणारे कार्यकर्ते हेच पक्षाची खरी ताकद'
या प्रकरणाबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सातत्याने संपर्क सुरू असल्याचे सांगताना राऊत यांनी पक्षाची संपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट केले. पक्षातील सर्व कार्यकर्ते आणि नेते एकत्र असल्याचा दावा त्यांनी केला. काही खासदार गैरहजर राहिल्याने पक्ष कमकुवत होत नाही, असे सांगताना त्यांनी पक्ष म्हणजे केवळ चार-पाच खासदार नसून त्यांना निवडून देणारे कार्यकर्ते आणि जनतेचा पाठिंबा महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले. रस्त्यावर उतरून लढणारे कार्यकर्ते हेच पक्षाची खरी ताकद असल्याचेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा : ठाकरेंनी उमेदवारी दिल्यास 2029 ची लोकसभा लढणार आहात का? कैलास पाटील म्हणाले...









