ठाकरेंनी उमेदवारी दिल्यास 2029 ची लोकसभा लढणार आहात का? कैलास पाटील म्हणाले...
Kailas patil on lok sabha election 2029 : धाराशिवमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कैलास पाटील यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. 2029 लोकसभा निवडणुकीबाबतही पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असे त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ठाकरेंनी उमेदवारी दिल्यास 2029 ची लोकसभा लढणार आहात का?
कैलास पाटील नेमकं काय म्हणाले...?
Kailas patil on lok sabha election 2029 : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेबाबत निर्माण झालेल्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नसल्याचे सांगितले. त्याचवेळी आपण आणि आमदार प्रवीण स्वामी हे दोघेही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबतच राहणार असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. पक्षात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत अद्यापही संदिग्धता असल्याचे सांगताना, ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या निर्णयामागील कारणे ते स्वतःच स्पष्ट करू शकतील, असेही कैलास पाटील यांनी म्हटले.
हेही वाचा : Monsoon Update: मान्सून रेकॉर्ड ब्रेक करणार? पावसासाठी 'ही' नवी तारीख पण...
2029 ची लोकसभा लढणार का? कैलास पाटील म्हणाले...
मुलाखतीदरम्यान ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य भूमिकेचा आणि त्यातून धाराशिवमधील भविष्यातील राजकीय समीकरणांचा विषय उपस्थित झाला. जर भविष्यात पक्षाला धाराशिव लोकसभा मतदारसंघात नवीन उमेदवाराची गरज भासली, तर आपण निवडणूक लढवण्यास तयार आहात का, असा प्रश्न कैलास पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट होकार किंवा नकार न देता, लोकसभा निवडणुकीला अजून तीन वर्षांचा कालावधी असल्याचे सांगितले. त्या वेळी निर्माण होणारी राजकीय परिस्थिती, महाविकास आघाडीची भूमिका आणि पक्षाचा निर्णय यानुसारच पुढील भूमिका निश्चित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : ठाकरेंचे 6 खासदार फुटले पण ट्रोलर्सने सोशल मीडियावर ओमराजेंचाच बाजार का उठवला? विषय लईच गंभीर!









