आईनं 6 आणि 4 वर्षाच्या मुलांची केली हत्या, नंतर स्वत:ला..

मुंबई तक

Crime News : महिलेनं आपल्या 6 वर्षाच्या मुलाची आणि 4 वर्षांच्या मुलीची हत्या केली, नंतर गळफास लावून जीवन संपवलं. घटनास्थळी चिट्ठीत धक्कादायक कारण समोर आलं. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

आईनेच 6 वर्षाच्या मुलाची आणि 4 वर्षांच्या मुलीची हत्या

point

नंतर स्वत:ला देखील संपवलं

Crime News : तेलंगणााच्या विकाराबाद जिल्ह्यातील अडवी व्यंकटपुरम या गावात धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनीता (वय 32) महिलेनं आपल्या 6 वर्षाच्या मुलाची आणि 4 वर्षांच्या मुलीची हत्या केली, नंतर गळफास लावून जीवन संपवलं. घटनास्थळी आढळून आलेल्या चिठ्ठीत धक्कादायक कारण समोर आलं. 

हे ही वाचा : दीराचे वहिनीशी प्रेमसंबंध, नणंदेनं नको त्या अवस्थेत पाहिलं अन्..

सुसाईड नोटमध्ये काय? 

पोलिसांनी माहिती दिली की, घटनास्थळावर गळफास घेतल्यानंतर सुसाईड नोट आढळली होती. संबंधित चिठ्ठीत महिलेनं लिहिलं होतं की, 'मृत्यूला कोणीही जबाबदार नाही', पुढे तिने असंही नमूद केलं की, तिची मुले तिच्याशिवाय जगू शकत नसल्याने तिने त्यांचा जीव घेतला. या घटनेसाठी तिचा पती जबाबदार नसल्याचेही तिने स्पष्ट केले. 

पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवेले आणि गुन्हा दाखल करून तपास सुरु कएला. घटनेचे कारण शोधण्यासाठी प्रकरणाचा पुढील तपास करण्यात आला आहे. लक्षात घेण्यासारखी बाब अशी की, असाच एक धक्कादायक प्रकार दिल्लीतून उघडकीस आला आहे. 

घटनेची पुनरावृत्ती 

शनिवारी ज्योती नगर परिसरात एका घरातून 54 वर्षीय पुरूष आणि 13 वर्षीय मुलाचे मृतदेह आढळून आले. पोलिसांच्या माहितीनुसार, मृताची ओळख प्रवीण शर्मा (वय 54) अशी पटली. पोलिसांना संशयास्पदपणे आत्महत्येची तक्रार दाखल झाल्यानंतर, ज्योती नगर पोलीस ठाण्याचे पथक छज्जुपूर येथील घरी पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना खोलीत प्रवीण शर्माचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. नंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली.

हे वाचलं का?