शेजारच्या विधवेला चहाला बोलावलं अन् केलं कांड, हात-पाय एकीकडे, शीर दुसरीकडे
एका महिलेने शेजारी राहणाऱ्या वृद्धेला चहासाठी घरी बोलावले. यावेळी दोघींमध्ये बोलणं सुरु असातानाच त्या महिलेने वृद्धेच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घातला. यापुढं काय घडलं, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शेजारच्या विधवेला चहाला बोलावलं अन् केलं कांड
हात-पाय एकीकडे, शीर दुसरीकडे
Crime News : पोलिसांनी एका अत्यंत क्रूर आणि थरारक मर्डर केसचा अवघ्या पाच दिवसांत छडा लावला आहे. 70 वर्षीय विधवा महिला हरबाई गुर्जर यांची गळा चिरून आणि हात-पाय तोडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या 50 वर्षीय रसाल देवी वैष्णव या विधवा महिलेला अटक केली आहे. पोलिसांसमोर मोठे आव्हान बनलेल्या या हत्याकांडाचा गुंता यशस्वीपणे सोडवण्यात आला आहे. राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील ही घटना आहे.
चहा प्यायला बोलावलं अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रसाल देवी ही सावकारांच्या कर्जाच्या विळख्यात पूर्णपणे अडकली होती. सावकार तिच्याकडे मुद्दल आणि व्याजाच्या वसुलीसाठी सतत दबाव टाकत होते. अशातच तिची नजर मृत हरबाई गुर्जर यांच्या हाता-पायात असलेल्या चांदीच्या जड कड्यांवर पडली. कर्ज फेडण्यासाठी तिने हरबाई यांच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार, 9 जून रोजी तिने हरबाई यांना आपल्या घरी चहा पिण्यासाठी बोलावले. घरात चर्चा सुरू असतानाच, संधी साधून रसाल देवीने कुऱ्हाडीने हरबाई यांच्या मानेवर वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर, चांदीची कडी सहज काढता यावीत म्हणून तिने मृतदेहाचे शीर, दोन्ही हात आणि दोन्ही पाय धडावेगळे केले आणि दागिने काढून घेतले.
हे ही वाचा : गे डेटिंग अॅपवरून मैत्री, भेटायला बोलावलं अन् खोलीत 7 जण..
मृतदेह गोणीत भरुन फेकला
हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी रसाल देवीने अत्यंत क्रूर पाऊल उचलले. तिने मृतदेहाचे धड आणि कापलेले हात-पाय एका गोणीत भरले आणि रात्रीच्या अंधारात गावाबाहेर असलेल्या कचराकुंडीत फेकून दिले. तसेच मृत महिलेचे शीरही तिने काही अंतरावर फेकून दिले. या थरारक गुन्ह्यानंतर रसाल देवी पुढील तीन दिवस घराबाहेर पडली नाही आणि तिने घरातील रक्ताचे डाग व हत्येचे इतर पुरावे मिटवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पोलिसांनी सांगितले की, रसाल देवीला तीन मुले असून ती इतर जिल्ह्यांत राहतात. मुलांच्या लग्नासाठी तिने हे कर्ज घेतले होते, जे व्याजासह तब्बल 25 लाख रुपयांवर पोहोचले होते. त्यापैकी 8 लाख रुपये तिला तातडीने भरायचे असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
हे ही वाचा : सोलापूर : जेलमधून थेट मतदानासाठी, न्यायालयाचीही परवानगी, शालन शिंदे आहेत तरी कोण?
माहेरी रहायची वृद्ध महिला
पोलिसांनी संशयाच्या आधारे रसाल देवीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाड आणि मृत हरबाई यांची चांदीची कडी जप्त केली आहेत. सध्या पोलिसांनी रसाल देवीला अटक करून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. दरम्यान, मृत हरबाई या पतीच्या निधनानंतर आपल्या माहेरी भावाच्या घरासमोर एका कच्च्या झोपडीत राहत होत्या. 11 जूनच्या उशिरा संध्याकाळी त्यांचा गोणीत बंद असलेला छिन्नविछिन्न मृतदेह आढळून आला होता, ज्याचा आता पोलिसांनी पूर्ण खुलासा केला आहे.









