गोड बोलून प्रेयसीला नेलं अन्..., रेल्वेच्या तिकीटावरुन हत्येचा उलगडा
एका रेल्वे तिकिटाच्या साहाय्याने पोलिसांनी एका खुनाचे गूढ अत्यंत कौशल्याने उकलले आहे. या गुन्ह्यात मिळालेल्या एका महत्त्वाच्या सुगाव्याने तपासाची दिशाच बदलून टाकली आणि पोलीस थेट आरोपींपर्यंत पोहोचले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गोड बोलून प्रेयसीला नेलं अन्...
रेल्वेच्या तिकीटावरुन हत्येचा उलगडा
Crime News : मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात एका रेल्वे तिकिटाच्या साहाय्याने पोलिसांनी एका खुनाचे गूढ अत्यंत कौशल्याने उकलले आहे. या गुन्ह्यात मिळालेल्या एका महत्त्वाच्या सुगाव्याने तपासाची दिशाच बदलून टाकली आणि पोलीस थेट आरोपींपर्यंत पोहोचले. ही थरारक घटना मेहगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरोली गावात घडली. 3 जून रोजी गावाजवळील एका कालव्याच्या कडेला एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे तिच्या मृतदेहाच्या अवस्थेवरून स्पष्ट होत होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन तपास सुरू केला.
रेल्वेच्या एका तिकीटामुळे उलगडा
घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांना मृतदेहाजवळ एक रेल्वे तिकीट सापडले. या तिकिटावर मथुरा ते ग्वाल्हेर असा प्रवास केल्याची नोंद होती. हेच तिकीट या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा धागा ठरले. पोलिसांनी तिकीट घेऊन थेट मथुरा रेल्वे स्टेशन गाठले आणि तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा मृत महिलेच्या साडीसारखीच साडी नेसलेली एक महिला त्यात दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी ग्वाल्हेर आणि सोनी रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्या महिलेसोबत दोन तरुणही दिसले. स्थानिक पातळीवर केलेल्या चौकशीत सीसीटीव्हीत दिसणारा मुख्य संशयित हा नारायण बघेल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता या हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा झाला.
हे ही वाचा : सेंटर पॉईंट: फुटीर खासदार आणि 'हाचिको' श्वानाची गोष्ट, सत्तेतल्या नेत्यांना झालाय भस्म्या?
एकाच वेळी दोघींसोबत प्रेमसंबंध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे तीन वर्षांपूर्वी सुरतमध्ये नारायण बघेलची ओळख इंद्रावती नावाच्या महिलेशी झाली होती. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर त्यांनी मंदिरात लग्न केले. दरम्यान, नारायणचे गेल्या 10 वर्षांपासून भिंड येथील संगीता बघेल नावाच्या दुसऱ्या महिलेसोबतही प्रेमसंबंध होते आणि ती त्याच्यावर लग्नासाठी सतत दबाव टाकत होती. दुसरीकडे, इंद्रावती देखील नारायणने तिला आपल्या गावी नेऊन पत्नीचा दर्जा द्यावा यासाठी आग्रही होती. यापूर्वी तिने पोलिसांत तक्रारही केली होती. या दोन्ही बाजूंच्या सततच्या दबावाला कंटाळून आणि या जाळ्यातून सुटका करून घेण्यासाठी नारायणने इंद्रावतीच्या हत्येचा कट रचला.
हे ही वाचा : विद्यार्थी परीक्षेत नापास, 11 एक्सपायर्ड गोळ्या खाल्ल्या अन्..
प्रेयसी आणि मित्रासोबत मिळून कांड
या कटानुसार, नारायणने आपली प्रेयसी संगीता आणि एका मित्राच्या मदतीने इंद्रावतीला मेहगाव येथे आणले. एका निर्जन ठिकाणी नेऊन त्यांनी आधी इंद्रावतीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून फावड्याने तिचे डोके ठेचून काढले. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र घटनास्थळी नजरचुकीने सुटलेले रेल्वे तिकीट त्यांची सर्वात मोठी चूक ठरले. पोलिसांनी सांगितले की, तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि सखोल चौकशीच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी नारायण बघेल, त्याची प्रेयसी संगीता बघेल आणि त्याच्या मित्राला अटक केली असून, न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये केली आहे.









