‘किमान आदित्य ठाकरेंनी तरी...’, फुटलेले ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?

मुंबई तक

OmRaje nimbalkar on Aaditya Thackeray : "मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे, भावनिकदृष्ट्या विचार केला तर हे पाऊल चुकीचं वाटतं. परंतु राजकीयदृष्ट्या विचार केला तर हेच बरोबर आहे", अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

OmRaje nimbalkar on Aaditya Thackeray :
OmRaje nimbalkar on Aaditya Thackeray :
google news

बातम्या हायलाइट

point

‘किमान आदित्य ठाकरेंनी तरी...’,

point

फुटलेले ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?

OmRaje nimbalkar on Aaditya Thackeray, गणेश जाधव : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी 'दिव्य मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका मांडली आहे.. सध्या सत्तेची ताकद आणि आर्थिक बळ इतरांकडे असताना आपल्या हातात केवळ निष्ठाच शिल्लक असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, या निष्ठेच्या आधारे मतदारसंघातील नागरिकांची कामेच होत नसतील, तर जनतेसमोर कोणत्या चेहऱ्याने जावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. किती काळ रिकाम्या हाताने फिरायचे, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आता आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरलेला नसल्याचे सांगत त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले. भावनिक दृष्टिकोनातून हा निर्णय चुकीचा वाटू शकतो, मात्र राजकीय भवितव्याच्या दृष्टीने तो आवश्यक आणि योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या ते पुण्यात असून, 20 जून रोजी वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी निकाल लागल्यानंतर धाराशिवमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : ठाकरेंनी उमेदवारी दिल्यास 2029 ची लोकसभा लढणार आहात का? कैलास पाटील म्हणाले...

ओमराजेंनी मुलाखतीत खालील 6 मुद्दे मांडले   

"मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे, भावनिकदृष्ट्या विचार केला तर हे पाऊल चुकीचं वाटतं. परंतु राजकीयदृष्ट्या विचार केला तर हेच बरोबर आहे. शिवसेनेतील प्रवेशावरून माझ्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे. मी सध्या पुण्यात आहे, 20 जून रोजी माझ्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा निकाल येणार आहे, त्यानंतर मी मतदारसंघात जाणार आहे. त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेईन", असं निंबाळकरांनी नमूद केलं

'बंडखोरी पैशांसाठी नव्हे, मतदारांसाठी'

"पैसे घेतल्याची चर्चा पूर्णपणे खोटी आणि तथ्यहीन आहे. माझ्यासाठी सत्ता आणि पैसा नेहमीच गौण राहिलेलं आहे. हा निर्णय पैशांसाठी नाही तर मतदारसंघातील विकासकामं आणि अपेक्षेने पाहणाऱ्या मतदारांसाठी घेतलेला आहे", असं स्पष्टीकरणही ओमराजे यांनी दिलं. 

हे वाचलं का?