प्रविण तरडेची 'ती' भावनिक पोस्ट अन् 'देऊळ बंद-3' सिनेमाची मोठी घोषणा!

मुंबई तक

'देऊळबंद-2' चित्रपटाला प्रदर्शित होऊन 75 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिग्दर्शक-अभिनेते प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

ADVERTISEMENT

major announcement for deool band 3 movie pravin tarde emotional post goes viral
देऊळ बंद सिनेमा (फोटो सौजन्य: प्रविण तरडे फेसबुक)
Google CTA

बातम्या हायलाइट

point

प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली.

point

प्रेक्षकांचे आभार मानत यशाचे श्रेय चाहत्यांना दिले.

point

'देऊळबंद-3' लवकरच घेऊन येणार असल्याची मोठी घोषणा.

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते प्रविण तरडे यांनी त्यांच्या सुपरहिट 'देऊळ बंद-2' चित्रपटाबाबत मोठी घोषणा केली आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन 75 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

प्रविण तरडे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे,

देऊळ बंद-2... काल 75 दिवस पूर्ण झाले... आज सिनेमा सर्व चित्रपटगृहातून काढत आहेत... तुम्ही दिलेल्या यशाबद्दल कायम तुमच्या ऋणात...

या शब्दांत त्यांनी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले.

हे ही वाचा>> Gen Z सह सर्वांनी ऐकावं असं IAS तुकाराम मुंढेंचं खणखणीत भाषण!

'देऊळ बंद-3'ची अधिकृत घोषणा

याच पोस्टमध्ये प्रविण तरडे यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी लिहिले,

"लवकरच 'देऊळ बंद-3' घेऊन पुन्हा भेटायला येऊ."

या एका वाक्यामुळे 'देऊळ बंद' मालिकेच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. चित्रपटाचा तिसरा भाग येणार असल्याचे संकेत मिळाल्याने सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छा आणि उत्सुकतेच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.