Gen Z सह सर्वांनी ऐकावं असं IAS तुकाराम मुंढेंचं खणखणीत भाषण!
IAS officer Tukaram Mundhe Speech : अमरावतीतील विशेष संवाद कार्यक्रमात आयएएस तुकाराम मुंढे यांनी यूपीएससी निकालाचा 21 वर्षांपूर्वीचा भावूक किस्सा सांगत यश, विवेक, सोशल मीडिया आणि नैतिकतेवर तरुणांना महत्त्वाचा संदेश दिला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Gen Z सह सर्वांनी ऐकावं असं IAS तुकाराम मुंढेंचं खणखणीत भाषण!
IAS officer Tukaram Mundhe Speech : अमरावती येथे आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात ज्येष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपल्या आयुष्यातील 21 वर्षांपूर्वीचा एक भावूक आणि प्रेरणादायी अनुभव सांगितला. 2005 मध्ये यूपीएससीचा अंतिम निकाल लागल्यानंतर अवघ्या एका क्षणात समाजाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला, याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. "3 वाजून 59 मिनिटांपर्यंत मला 'तुकाराम' म्हणून हाक मारली जात होती आणि चार वाजता निकाल लागल्यानंतर 'सर' म्हणून संबोधलं जाऊ लागलं," असे सांगत त्यांनी पदापेक्षा विचार, आचरण आणि मूल्ये अधिक महत्त्वाची असल्याचा संदेश दिला. यश मिळाल्यानंतरही आपल्या तत्त्वांशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करू नये, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले.
हेही वाचा : राहुल गांधींनी ‘Gen Z’ साठी केलेलं K-Pop स्टाइल आहे तरी काय? Friendship Day निमित्त खास शुभेच्छा!
मुंढे यांनी सांगितले की, यूपीएससीमध्ये यश मिळाल्यानंतर मसुरी येथील प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला होता. त्याच काळात ते अमरावतीतही आले होते. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेली एक विद्यार्थिनी त्यावेळी चौथी-पाचवीत होती. त्या भाषणातून प्रेरणा घेऊन तिने यूपीएससी करण्याचा निर्धार केला आणि काही वर्षांपूर्वी तिची इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये निवड झाली, अशी आठवण त्यांनी सांगितली. मात्र त्या यशाचे श्रेय स्वतःला नसून त्या विद्यार्थिनीला आणि तिच्या पालकांना असल्याचे नमूद करत त्यांनी प्रेरणा ही कृतीतूनच सिद्ध होते, असे सांगितले. याच वेळी त्यांनी स्वतःच्या अपयशाचाही उल्लेख केला. 1997, 1998 आणि 1999 मध्ये यूपीएससीच्या मुलाखतीपर्यंत पोहोचूनही अंतिम यश मिळाले नव्हते. त्यानंतर एमपीएससी, नोकरी आणि लेक्चरशिप करत अखेर 2005 मध्ये यूपीएससीत यश मिळाल्याचे सांगत त्यांनी यशामागील संघर्ष समजून घेण्याचे आवाहन केले.
हेही वाचा : Personal Finance: जुना फ्लॅट विकताना कोणत्या चुकांमुळे होतं सर्वाधिक नुकसान?
