महिला पोलिसावर बलात्कार, ब्लॅकमेलिंग अन् तीन वेळा गर्भपात; इन्स्पेक्टर निलंबित
एका हेड इन्स्पेक्टरने महिला पोलीस अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करत बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. लुधियानामधील ही घटना असून पीडितेने अनेक धक्कादायक दावे केले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिला पोलिसावर बलात्कार
ब्लॅकमेलिंग अन् तीन वेळा गर्भपात
इन्स्पेक्टर निलंबित
Crime News : एका हेड इन्स्पेक्टरने महिला पोलीस अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करत बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित अधिकाऱ्याच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने त्याच्यावर बलात्कार आणि जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचा आरोप केला आहे. पंजाबच्या लुधियानामधील ही घटना आहे. साहिबमीत सिंग असं आरोपी इन्स्पेक्टरचं नाव आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन एसएसपी डॉ. अंकुर गुप्ता यांच्या आदेशानुसार आरोपीला तात्काळ निलंबित करण्यात आले असून, गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार आहे.
बेशुद्ध करुन बलात्कार अन् ब्लॅकमेलिंग
पीडित महिला अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, 2023 मध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिची साहिबमीत सिंगशी ओळख झाली होती. नोव्हेंबर 2023 मध्ये आरोपीने तिला भेटायला बोलावून 'ग्रँड मॅरी व्हिला' येथे नेले. तेथे तिला अमली पदार्थमिश्रित कॉफी देऊन बेशुद्ध करण्यात आले आणि तिच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवण्यात आले. भान आल्यावर विरोध दर्शवला असता, आरोपीने तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याचे सांगून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच परवानाधारक पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.
हे ही वाचा : फलटणमधील डॉक्टरची कथित सुसाईड नोट व्हायरल, भाजप नेत्याचं नाव घेत गंभीर आरोप
पतीपासून झाली वेगळी
या आक्षेपार्ह व्हिडिओचा धाक दाखवून आरोपी साहिबमीत सिंगने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार अत्याचार केले. पीडितेचे 2022 मध्ये लग्न झाले होते, परंतु हे व्हिडिओ तिच्या पतीला आणि सासरच्या लोकांना पाठवण्याची धमकी देऊन तिच्यावर घटस्फोटासाठी दबाव आणला गेला, ज्यामुळे तिला पतीपासून वेगळे व्हावे लागले. नंतर आरोपीने तिला स्वतःच्या घरी नेऊन आई नवनीत कौरशी ओळख करून दिली. पीडितेने संपूर्ण प्रकार त्याच्या आईला सांगितला असता, त्यांनी वाद न घालण्याचा सल्ला देत लग्नाचे आश्वासन दिले.
हे ही वाचा : Ajinkya Rahane Networth : मुंबईत आलिशान घर, लक्झरी कार्स... मराठमोळ्या अजिंक्य रहाणेची संपत्ती आहे तरी किती?
तीन वेळा गर्भपात
या सर्व प्रकारात साहिबमीत सिंगने पीडितेवर तीन वेळा औषधे देऊन जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचाही आरोप महिला अधिकाऱ्याने केला आहे. याबाबत त्याच्या आईला सांगूनही आरोपी तिला वारंवार घरी नेऊन अत्याचार करत राहिला. अखेर पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी हेड इन्स्पेक्टर साहिबमीत सिंगविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकले जात आहेत.
