चुलत भाऊ-बहिण प्रेमात पडले, लग्न केलं; पण शेवटी घडलं भयंकर
कानपूरमध्ये कोर्ट मॅरेज केलेल्या सौरभ आणि राणी या जोडप्याचे मृतदेह त्यांच्या खोलीत आढळून आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला, तिच्या कपाळाला कुंकू लावले आणि नंतर स्वतः गळफास घेतला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चुलत भाऊ-बहिण प्रेमात पडले
लग्न केलं
पण शेवटी घडलं भयंकर
Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूरमधील बर्रा परिसरात एका नवविवाहित दांपत्याच्या प्रेमविवाहाचा अत्यंत करुण आणि धक्कादायक अंत झाल्याची घटना समोर आली आहे. एका भाड्याच्या खोलीत 22 वर्षीय सौरव सविता उर्फ टोनी या तरुणाने आपली 18 वर्षांची पत्नी राणी उर्फ शालिनी हिचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर स्वत: पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे जमिनीवर पत्नीचा मृतदेह पडलेला होता, तर पती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. फॉरेन्सिक टीमने पाहणी केली असता, संपूर्ण खोलीत कुंकू पसरलेलं दिसलं. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने तिच्या भांगेत सिंदूर भरला आणि मग स्वत: गळफास घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तीन वर्षांपासून प्रेमसंबंध
मृत सौरव आणि राणी हे दोघेही सचेंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कला का पुरवा गावचे रहिवासी होते. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते, मात्र नात्याने ते चुलत बहीण-भाऊ लागत असल्याने कुटुंबीयांचा या नात्याला तीव्र विरोध होता. कुटुंबीयांचा विरोध झुगारून सुमारे तीन महिन्यांपूर्वी दोघांनी घराबाहेर पडून कोर्ट मॅरेज केले होते. लग्नानंतर दोघे काही दिवस दिल्लीत राहत होते. अवघ्या पाच दिवसांपूर्वीच ते कानपूरला परतले आणि एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर भाड्याने खोली घेऊन राहू लागले होते. मंगळवारी (28 जुलै) दुपारी दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका वृद्ध महिलेला व्हेंटिलेटरमधून (रोशनदान) तरुण पंख्याला लटकलेला दिसल्याने या घटनेचा खुलासा झाला.
हे ही वाचा : 'तुम्ही विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडता, गृहमंत्र्यांमध्ये इथे बसण्याची हिंमत नाही', राहुल गांधींचं भाषण अन् लोकसभेत राडा
आईचा वेगळा दावा
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त (दक्षिण) दीपेंद्र नाथ चौधरी यांच्यासह पोलीस पथक आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडून आत प्रवेश केला. या घटनेबाबत राणीच्या आईने सांगितले की, घटनेच्या काही वेळ आधीच त्यांचे मुलगी आणि जावयाशी बोलणे झाले होते, तेव्हा कोणत्याही वादाचा संशय आला नव्हता. कोर्ट मॅरेज झाल्यानंतरही सौरवचे कुटुंब राणीचा स्वीकार करत नव्हते आणि दोघांवर वेगळे होण्यासाठी सतत दबाव आणला जात होता, असा आरोप राणीच्या आईने केला आहे.
हे ही वाचा : मुलगा मानसिक रुग्ण, विटेनं हल्ला करत आईची हत्या; बहिणीला देखील सोडलं नाही
घरमालक काय म्हणाला?
सध्या पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पतीने आधी पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वत:चे आयुष्य संपवले असे दिसून येत आहे, परंतु मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन (पोस्टमार्टम) अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान, या घटनेमुळे शहरात भाडेकरूंच्या पोलीस पडताळणीचा (वेरीफिकेशन) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, कारण घरमालकाला या दांपत्याबद्दल कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. पोलीस सध्या दुचाकीच्या क्रमांकावरून नातेवाईकांशी संपर्क साधून सर्व बाजूंनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
