सात वर्ष नात्यातील तरुणीवर लैंगिक अत्याचार, CA ला अटक; लग्न झाल्यानंतरही...
एका चार्टर्ड अकाऊंटंटने नात्यातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. तिला सात वर्ष ब्लॅकमेल करुन लैंगिक छळ केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन सीएला गुरुग्राम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सात वर्ष नात्यातील तरुणीवर लैंगिक अत्याचार
CA ला अटक
लग्न झाल्यानंतरही ब्लॅकमेल
Crime News : एका सीएने आपल्या नात्यातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या काही वर्षांपासून तिचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल आणि लाखो रुपये उकळल्याचाही आरोप होत आहे. एवढेच नव्हे तर आरोपीने पीडितेचे दोन वेळा लग्न मोडल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी सितारगंज येथील रहिवासी असलेल्या चार्टर्ड अकाउंटंटला बरेली येथून अटक केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून 25 जुलै रोजी गुरुग्रामच्या पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लैंगिक अत्याचार अन् लाखो रुपये उकळले
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये सीएच्या अभ्यासादरम्यान त्यांची ओळख झाली होती. कौटुंबिक नातेसंबंध असल्याने त्यांच्यात विश्वास निर्माण झाला. 2020 मध्ये पीडिता नातेवाईकांना भेटण्यासाठी सितारगंज येथे आली असताना आरोपीने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार केले आणि तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ चोरून तयार केले. यानंतर 2021 ते 2023 दरम्यान जेव्हा जेव्हा पीडिता नोकरीनिमित्त गुरुग्रामला जायची, तेव्हा आरोपी तिला हॉटेलमध्ये बोलावून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करायचा. या काळात आरोपीने तिचा फोन ताब्यात घेऊन तिचे व्हॉट्सॲप, ईमेल आणि बँक खात्यांवर ताबा मिळवला आणि तिच्याकडून 20 ते 25 लाख रुपये उकळले.
हे ही वाचा : 16 वर्षीय मेहुणीवर दाजीकडून लैंगिक अत्याचार, नात्याला काळिमा फासणारा प्रकार
लग्न झाले तरीही हॉटेलमध्ये बोलावून
2023 मध्ये आरोपीचे दुसऱ्या मुलीशी लग्न झाले, तरीही त्याने पीडितेचा पाठलाग सोडला नाही. फेब्रुवारी 2026 मध्ये जेव्हा पीडितेचा विवाह ठरला, तेव्हा आरोपीने तिच्या होणाऱ्या पतीला आणि नातेवाईकांना ते आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवून लग्न मोडले. यानंतर दुसऱ्या ठिकाणी ठरलेला विवाहही त्याने याच पद्धतीने मोडला. याप्रकरणी दोन्ही कुटुंबांमध्ये पंचायत झाली होती, ज्यात आरोपीने पुन्हा त्रास न देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र त्यानंतरही त्याची धमकी आणि ब्लॅकमेलिंग सुरूच राहिले. अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेत फिर्याद नोंदवली.
हे ही वाचा : 16 वर्षीय मुलीचा मृतदेह कबरीतून काढला बाहेर, कुटुंबीयांना ऑनर किलिंगचा संशय
आरोपीला न्यायालयीन कोठडी
गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुग्राम पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. सुरुवातीला पोलीस सितारगंज येथे पोहोचले, मात्र तो तिथे सापडला नाही. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचे लोकेशन बरेली येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत 29 जुलै रोजी त्याला बरेलीतून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून, सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलीस आता आरोपीचा मोबाईल, लॅपटॉप, सोशल मीडिया खाती आणि बँक व्यवहारांची न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तपासणी करत आहेत.
