Govt Jobs : कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, विविध पदांसाठी भरती, अर्ज कसा कराल?

मुंबई तक

कोकण रेल्वेने 12 वेगवेगळ्या पदांसाठी एकूण 201 जागांची पदभरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया ऑगस्ट 2026 च्या शेवटच्या आठवड्यात ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची शक्यता असून, संगणकावर आधारित परीक्षा (CBT) सप्टेंबर 2026 मध्ये आयोजित केली जाऊ शकते.

ADVERTISEMENT

Konkan Railway Recruitment
Konkan Railway Recruitment
Google CTA

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

point

विविध पदांसाठी भरती, अर्ज कसा कराल?

Konkan Railway Recruitment : कोकण रेल्वेने (KRCL) 12 वेगवेगळ्या पदांसाठी एकूण 201 जागांची पदभरती जाहीर केली आहे. यामध्ये सिनियर सेक्शन इंजिनिअर, ज्युनियर इंजिनिअर, स्टेशन मास्टर, असिस्टंट लोको पायलट, ट्रॅक मेंटेनर्स, सेक्शन कंट्रोलर आणि टेक्निशियन यांसारख्या विविध महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया ऑगस्ट 2026 च्या शेवटच्या आठवड्यात ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची शक्यता असून, संगणकावर आधारित परीक्षा (CBT) सप्टेंबर 2026 मध्ये आयोजित केली जाऊ शकते. इच्छुक उमेदवारांना कोकण रेल्वेच्या www.konkanrailway.com या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा लागेल.

'या' उमेदवारांना प्राधान्य

या भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांची निवड करताना विशिष्ट प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. निवड प्रक्रियेत किमान उत्तीर्ण गुण मिळवणाऱ्या उमेदवारांपैकी प्रकल्पग्रस्त किंवा जमीन गमावलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य (Land Loser candidates) दिले जाईल. कोकण रेल्वेच्या मार्गावरील रोजगार विनिमय केंद्रात (Employment Exchange) नोंदणीकृत असलेल्या उमेदवारांना द्वितीय प्राधान्य, तर महाराष्ट्र, गोवा किंवा कर्नाटक राज्याचे रहिवासी असणारे आणि सध्याचे कोकण रेल्वे कर्मचारी असणाऱ्या उमेदवारांना तृतीय प्राधान्य दिले जाणार आहे.

हे ही वाचा : 16 वर्षीय मुलीचा मृतदेह कबरीतून काढला बाहेर, कुटुंबीयांना ऑनर किलिंगचा संशय

पगार किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती कोकण रेल्वेच्या कार्यक्षेत्रात म्हणजेच महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये केली जाईल. 7 व्या वेतन आयोगाच्या (7th CPC) वेतनश्रेणीनुसार उमेदवारांना आकर्षक पगार दिला जाणार आहे. सिनियर सेक्शन इंजिनिअर (S&T व मेकॅनिकल) पदासाठी लेव्हल 7 नुसार रु. 44,900 मूळ वेतन असेल. तसेच ज्युनियर इंजिनिअर, स्टेशन मास्टर, सेक्शन कंट्रोलर आणि कमर्शियल सुपरवायझर या पदांसाठी लेव्हल 6 नुसार रु. 35,400 इतके मूळ वेतन निश्चित करण्यात आले आहे.

हे ही वाचा : प्रेयसीसोबत राहण्यास मुलांचा अडथळा, 6 महिन्यांच्या बाळाला संपवून नाल्यात फेकलं

रेल्वेत कामाची सुवर्णसंधी

इतर पदांमध्ये गूड्स ट्रेन मॅनेजरसाठी लेव्हल 5 (रु. 29,200), असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन-III आणि ESTM-III या पदांसाठी लेव्हल 2 (रु. 19,900)नुसार वेतन दिले जाईल. तर ट्रॅक मेंटेनर-IV या लेव्हल 1 मधील पदासाठी रु. 18,000 चे मूळ वेतन मिळणार आहे. कोकण रेल्वेत शासकीय सेवेची संधी शोधणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, अधिक माहिती व सविस्तर सूचनेसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.