मुंबईची खबर : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत. या गाड्यांचं वेळापत्रक नेमकं कसं असणार आहे, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वे
जाणून घ्या वेळापत्रक
Mumbai News : आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने 246 विशेष गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये 184 मिश्र विशेष गाड्या (वातानुकूलित, शयनयान आणि अनारक्षित डबे) तसेच 62 पूर्णपणे अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. या सर्व विशेष गाड्यांमधील निश्चित गाड्यांच्या आरक्षणाला दिनांक 3 ऑगस्ट 2026 पासून सुरुवात होत आहे.
CSMT इथून जाणारी विशेष रेल्वे
या विशेष गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) - सावंतवाडी रोड दैनिक विशेष गाडीचा समावेश आहे. 11 सप्टेंबर 2026 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत ही विशेष गाडी धावणार आहे. ही गाडी CSMT येथून मध्यरात्री 12:25 वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी 2:20 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल, तर परतीच्या प्रवासासाठी गाडी सावंतवाडी रोड येथून दुपारी 3:35 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4:35 वाजता CSMT येथे पोहोचेल.
हे ही वाचा : 16 वर्षीय मुलीचा मृतदेह कबरीतून काढला बाहेर, कुटुंबीयांना ऑनर किलिंगचा संशय
लोकमान्य टिळक टर्मिनस इथून जाणारी विशेष रेल्वे
तसेच, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) - सावंतवाडी रोड दैनिक विशेष गाडी सकाळी 8:20 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 9 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल, तर सावंतवाडी रोड येथून रात्री 10:35 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11:25 वाजता LTT येथे पोहोचेल. ही विशेष गाडी 11 सप्टेंबर 2026 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत धावेल.
याशिवाय, LTT - सावंतवाडी रोड द्वि-साप्ताहिक विशेष गाडी 17 सप्टेंबर 2026 ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान धावणार आहे. ही गाडी दर गुरुवारी आणि रविवारी धावेल. सकाळी 8:45 वाजता सुटून रात्री 10:10 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल, तर येथून रात्री 11:20 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11:45 वाजता ही गाडी LTT येथे पोहोचेल.
