मासिक पाळीच्या आड नर्स करायची कांड, पोलिसांनाही सापडली नाही, अखेर...
एक नर्स मासिक पाळीसारख्या संवेदनशील विषयाशी जोडलेल्या सामाजिक संकोचाचा गैरफायदा घेत ड्रग्ज विकायची. केरळच्या उत्पादन शुल्क विभागाने तिला पकडल्यानंतर या घटनेचा भांडाफोड झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मासिक पाळीच्या आड नर्सकडून गैरप्रकार
पोलिसांनाही सापडली नाही
अखेर...
Crime News : मासिक पाळीसारख्या संवेदनशील विषयाशी जोडलेल्या सामाजिक संकोचाचा गैरफायदा घेत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका महिलेचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांच्या तपासणीतून वाचण्यासाठी एका महिला तस्कराने अत्यंत घृणास्पद मार्ग निवडला. तिने आपल्या गुप्तभागात वापरल्या जाणाऱ्या मेंस्ट्रुअल कपमध्ये लाखो रुपयांचे सिंथेटिक ड्रग 'एमडीएमए' (MDMA) सील करून ठेवले होते. बंगळुरूहून बसने प्रवास करताना पोलिसांच्या नेहमीच्या तपासणीत ही चालाखी उघडकीस आली नाही. यामुळे तिची हिंमत आणखी वाढली; मात्र केरळच्या उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department) सतर्कतेमुळे तिचा हा छुपा कट जास्त काळ टिकू शकला नाही.
आधी नर्स म्हणून काम करायची, नंतर...
केरळच्या उत्पादन शुल्क विभागाने 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत ही धडक कारवाई करत तस्करांच्या या नवनवीन क्लृप्तीचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सरिता (वय 30) आणि तिचा साथीदार मोहम्मद शफी (वय 29) या दोघांना अटक केली आहे. पूर्वी सरिता होम नर्स म्हणून काम करत होती, तर शफी इंटीरियर डिझायनर होता. अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून एकूण 94.032 ग्रॅम 'एमडीएमए' जप्त केले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. हे दोन्ही आरोपी बंगळुरूहून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ खरेदी करायचे आणि एरनाकुलम तसेच अलाप्पुझा येथील लॉजमध्ये खोल्या भाड्याने घेऊन तेथून अंमली पदार्थांची विक्री करायचे.
हे ही वाचा : 26 महिन्यांपूर्वी पतीची हत्या करुन गाडलं, दृश्यम स्टाईल मर्डर कसा आला उघडकीस?
'अशी' अडकली जाळ्यात
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाचे पथक गेल्या काही आठवड्यांपासून या दोघांवर बारीक लक्ष ठेवून होते. कारवाई दरम्यान पथकाने प्रथम मोहम्मद शफीला दक्षिण एरनाकुलम येथील एका लॉजमधून ताब्यात घेतले, जिथे त्याच्याकडून 65.27 एमडीएमए जप्त करण्यात आले. चौकशीत असे समोर आले की, बंगळुरूहून बसने प्रवास करत असताना कन्नूर जिल्ह्यातील इरिट्टी येथे तपासणी झाली, तेव्हा शफीने आपल्या जवळील ड्रग्ज फेकून दिले होते. परंतु, सरिताने मेंस्ट्रुअल कपमध्ये एमडीएमए भरून, त्याचे एक टोक डिंकाने सील करून ते शरीराच्या आत लपवले असल्याने तपासणीदरम्यान ते सापडले नाही आणि ती सुखरूप निसटली.
हे ही वाचा : 2 महिने फोन बंद, टेन्शननं अॅडमिट, अभिजित दिल्लीत; आई-वडिलांनी कसे काढले दिवस?
प्रति ग्रॅम 4000 रुपयांनी विक्री
यानंतर सरिता उरलेले ड्रग्ज विकण्यासाठी अलाप्पुझा येथे गेली होती. उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी ती परत येण्याची वाट पाहिली आणि रात्री 9:30 च्या सुमारास तिला अटक केली. तिच्या सांगण्यावरून अलाप्पुझा येथील एका घरातून आणखी 28.76 ग्रॅम एमडीएमए हस्तगत करण्यात आले. दोन्ही आरोपी हे एमडीएमए प्रति ग्रॅम 4000 रुपये दराने विकत असत.
