उद्धव ठाकरे असं बोलले की, संजय राऊत जोरात हसले; नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray : पुण्यातील कार्यक्रमात अमित शाहांचा उल्लेख 'देशाचे चाणक्य' असा करण्यात आलाय. या उल्लेखावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. ते नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
उद्धव ठाकरे असं बोलले की, संजय राऊत जोरात हसले
नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray on Amit Shah : पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य केले. पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा 'देशाचे चाणक्य' असा उल्लेख करण्यात आल्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी केवळ "चकणे" असा एक शब्दातील प्रतिसाद दिला. त्यांच्या या उत्तरानंतर खासदार संजय राऊत मोठ्याने हसल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांवर अस्मानी संकट, वरुणराजा खवळणार
मोदी-शाह हे स्वतःच्या सरकारविरोधातील असंतोषाचे जनक - ठाकरे
यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलताना लोकमान्य टिळकांचा उल्लेख करत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली. आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असल्याचे सांगत त्यांनी टिळकांना ब्रिटिशांविरोधातील असंतोषाचे जनक म्हटले जाते, असे नमूद केले. मात्र, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी स्वतःच्या सरकारविरोधातच असंतोष निर्माण केला असून ते स्वतःच्या सरकारविरोधातील असंतोषाचे जनक ठरले आहेत, असे ठाकरे म्हणाले.
हेही वाचा : 'स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नाही', पुण्यात आल्यावर अजित डोवालांनी टोचले Gen-Z चे कान
