26 महिन्यांपूर्वी पतीची हत्या करुन गाडलं, दृश्यम स्टाईल मर्डर कसा आला उघडकीस?
jamnagar 26 month old murder case : जामनगरमधील 26 महिन्यांपूर्वीच्या हत्याकांडात पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्यावसायिक भागीदारीचे आमिष दाखवून तरुणाची हत्या करून मृतदेह 13 फूट खोल खड्ड्यात पुरल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
26 महिन्यांपूर्वी पतीची हत्या करुन गाडलं
दृश्यम स्टाईल मर्डर कसा आला उघडकीस?
jamnagar 26 month old murder case : जामनगरमध्ये 26 महिन्यांपूर्वी घडलेल्या एका हत्याकांडाच्या तपासात पोलिसांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, ही हत्या अचानक घडलेली नसून तिचा संपूर्ण कट आधीच आखण्यात आला होता. मृत जिग्नेश याला नवीन व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न दाखवत एका कारखान्यात बोलावण्यात आले आणि तेथेच त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : 2 महिने फोन बंद, टेन्शननं अॅडमिट, अभिजित दिल्लीत; आई-वडिलांनी कसे काढले दिवस?
कारखाना केवळ मर्डर करुन पुरण्यासाठी भाड्याने घेतला
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृताची पत्नी आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड निलेश यांनी मिळून जिग्नेशला नव्या व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवले. त्यासाठी जामनगरमधील दरेड परिसरात एक कारखाना भाड्याने घेण्यात आला होता. पोलिसांचा दावा आहे की, हा कारखाना केवळ गुन्हा घडवून आणण्यासाठीच आधीपासून तयार ठेवण्यात आला होता.
हेही वाचा : 50 वर्षीय कोमलला कात्रीने भोसकले, नवरा फरार, मुलाने शेवटी काय केलं?
