2 महिने फोन बंद, टेन्शननं अ‍ॅडमिट, अभिजित दिल्लीत; आई-वडिलांनी कसे काढले दिवस?

मुंबई तक

अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJP च्या जंतर मंतरवरील आंदोलनानंतर धमेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यात आला. या आंदोलनादरम्यान अभिजीतच्या आईवडिलांनाही मनस्ताप सहन करावा लागला. मुंबई तक Exclusive मध्ये अभिजीत दिपके यांच्या आई-वडिलांनी प्रथमच मनमोकळेपणाने संवाद साधला.

ADVERTISEMENT

Abhijeet Deepke Family
Abhijeet Deepke Family
Google CTA

बातम्या हायलाइट

point

2 महिने फोन बंद, टेन्शननं अ‍ॅडमिट, अभिजित दिल्लीत

point

आई-वडिलांनी कसे काढले दिवस?

Abhijeet Deepke Family :  विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिल्लीत पार पडलेल्या आंदोलनानंतर अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. या आंदोलनात मुख्य भूमिका बजावणारे आंदोलक अभिजीत दीपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरी सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. अभिजीत यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके यांचे आई आणि वडील यांच्याशी विशेष संवाद साधण्यात आला, ज्यामध्ये त्यांनी या संपूर्ण आंदोलनादरम्यान आलेल्या भीषण प्रसंगांवर आणि आपल्या भावनांवर मोकळेपणाने प्रकाश टाकला.

20 तारखेचा लाठीचार्ज आणि पालकांची भीती

आंदोलनादरम्यान 20 तारखेला झालेल्या लाठीचार्जची आठवण काढताना अभिजीत यांची आई अत्यंत भावुक झाल्या. त्या म्हणाल्या, "शिक्षणमंत्र्यांनी आधीच राजीनामा दिला असता, तर 20 तारखेला विद्यार्थ्यांना असा अमानुष मार खावा लागला नसता. पोलिसांनी अत्यंत निर्दयीपणे लेकरांवर लाठीचार्ज केला. तो व्हिडिओ 21 तारखेला पाहिल्यानंतर मला रडू आवरत नव्हते. लहान मुलांसारख्या विद्यार्थ्यांना खिळे असलेल्या काठ्यांनी मारण्यात आले, ज्यामुळे माझा आणि माझ्या पतीचा बीपी खालावला व आम्हाला दोघांनाही रुग्णालयात दाखल करावे लागले होते."

अभिजीत यांच्या वडिलांनीही आपल्या भीतीबद्दल सांगताना स्पष्ट केले की, "उपोषणाला बसलेल्या तरुणांकडे सुरुवातीला कोणीही लक्ष दिले नाही. त्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडण्यात आले होते. त्यामुळे, सोनम सरांना जसे उचलून नेण्यात आले, तसेच अभिजीतच्या जीवाचेही काही बरं-वाईट करतील किंवा एखाद्याला पैसे देऊन त्याच्यावर 'शूट आऊट' करतील की काय, अशी भयंकर भीती आम्हाला वाटत होती."

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांवर अस्मानी संकट, वरुणराजा खवळणार

मुलाची जिद्द आणि पालकांचे आरोग्य

आंदोलनाच्या काळात पालकांनी अनुभवलेला मानसिक ताण आणि अभिजीतची जिद्द यावर भाष्य करताना आईने सांगितले, "आम्ही त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो दरवेळेस म्हणायचा की 'मम्मी, मी आता देशाचा आहे, मला जे करायचे आहे ते करू दे.' त्याने पोलिसांच्या पाया पडतानाचा आणि स्वतःची तब्येत बिघडलेली असतानाचा व्हिडिओ पाहून आमचा जीव टांगणीला लागला होता. सतत येणारे फोन आणि बातम्यांमुळे वाढणाऱ्या ताणामुळे आम्ही दोन महिन्यांच्या काळात आमचे फोन पूर्णपणे बंद ठेवले होते."