50 वर्षीय कोमलला कात्रीने भोसकले, नवरा फरार, मुलाने शेवटी काय केलं?

मुंबई तक

नवऱ्याने आपल्या बायकोची कात्रीने भोसकून हत्या केली. दिल्लीत घडलेल्या या घटनेने चांगलीच खळबळ माजली आहे. बायकोचा खून करुन नवरा फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

50 वर्षीय कोमलला कात्रीने भोसकले,

point

नवरा फरार

point

मुलाने काय केलं?

Crime News : पूर्व दिल्लीतील जगतपुरी परिसरात बुधवारी (29 जुलै) रात्री एका 54 वर्षीय पुरुषाने आपल्या 50 वर्षीय पत्नीची कात्रीने भोसकून निघृण हत्या केली. घटनेनंतर आरोपी पती घटनास्थळावरून पसार झाला. 30 जुलै रोजी रात्री सुमारे 9 च्या सुमारास जगतपुरी पोलीस ठाण्यात या हत्येबाबत पीसीआर (PCR) कॉलद्वारे माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तपास पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, महिला रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली आढळून आली.

मानेवर कात्रीने भोसकले

पोलीस तपासात मृत महिलेची ओळख 50 वर्षीय कोमल म्हणून झाली असून, आरोपी पतीचे नाव कमल (वय 54) आहे. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून आरोपी पतीने पत्नीच्या मानेवर कात्रीने वार करून तिची हत्या केली आणि त्यानंतर तिथून पळ काढला. घटनास्थळी फॉरेन्सिक आणि गुन्हे अन्वेषण पथकाने भेट देऊन पुरावे गोळा केले. त्यानंतर महिलेला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पुढील शवविच्छेदनासाठी रुग्णालयाच्या शवगृहात हलवण्यात आला आहे.

हे ही वाचा : अमित ठाकरे भाषण अर्ध्यात सोडून गेले.. पुन्हा आले; नेमकं काय घडलं?

पोलिसांनी काय सांगितले?

या प्रकरणी दांपत्याचा मुलगा गौरव याच्या जबाबाच्या आधारे जगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103(1) अंतर्गत हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलीस सर्व शक्यतांचा विचार करून सखोल तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूच्या नेमक्या कारणावर अधिक स्पष्टता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा : 2 महिने फोन बंद, टेन्शननं अ‍ॅडमिट, अभिजित दिल्लीत; आई-वडिलांनी कसे काढले दिवस?

नवरा फरार

दरम्यान, घटनेनंतर पसार झालेल्या आरोपी कमलचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आणि या हत्येमागची पार्श्वभूमी स्पष्ट करण्यासाठी पोलिसांची अनेक पथके रवाना करण्यात आली आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे जगतपुरी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.