अमित ठाकरे भाषण अर्ध्यात सोडून गेले.. पुन्हा आले; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Amit Thackeray stopped mid speech at mns event : मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात भाषणादरम्यान अमित ठाकरे काही क्षणांसाठी थांबले. प्रचंड उत्साहाच्या वातावरणात बोलायचे सुचत नसल्याचे त्यांनी स्वतःच व्यासपीठावर कबूल केले.

ADVERTISEMENT

Amit Thackeray stopped mid speech at mns event
Amit Thackeray stopped mid speech at mns event
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अमित ठाकरे भाषण अर्ध्यात सोडून गेले..

point

पुन्हा आले; नेमकं काय घडलं?

Amit Thackeray stopped mid speech at mns event : अमित ठाकरे मनसेच्या कार्यक्रमात स्टेजवर भाषण करत असताना काही क्षणांसाठी अचानक थांबले आणि त्यांना पुढे काय बोलायचे हे सुचेनासे झाले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) 20 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य मेळाव्यात हा प्रसंग घडला. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात मनसेच्या वतीने राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियानाचाही अधिकृत शुभारंभ करण्यात आला. अलीकडील विद्यार्थी आंदोलनं आणि पेपर लीकच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि अमित ठाकरे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

हेही वाचा : नवरा कामासाठी परराज्यात, इकडे बायकोने 6 महिन्यांच्या मुलाला संपवलं, नेमकं कारण काय?

 राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो - अमित ठाकरे 

भाषणाच्या सुरुवातीलाच अमित ठाकरे यांनी विविध विद्यार्थी आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या युवक-युवतींचे आणि त्यांच्या पालकांचे कौतुक केले. आंदोलनातून केंद्रात राजीनामा घडवून आणणाऱ्या तरुणांसाठी जोरदार टाळ्या वाजवण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. त्यानंतर त्यांनी स्वतःबद्दल बोलताना, "मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो," असे स्पष्टपणे सांगितले. मात्र, त्याचवेळी केवळ राज ठाकरे यांच्यामुळे नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच आपण राजकारणात टिकून आहोत, असेही त्यांनी नमूद केले. राज्यभराच्या दौऱ्यात अनेक तरुणांना भेटण्याची संधी मिळाली आणि मनविसेची उभारणी कार्यकर्त्यांच्या जोरावरच झाली, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : 'माझं पुण्याशी 76 वर्षांपूर्वीचं नातं, दर मंगळवारी मी...', अजित डोवालांनी पुण्याविषयी नेमकं सांगितलं तरी काय?