नवरा कामासाठी परराज्यात, इकडे बायकोने 6 महिन्यांच्या मुलाला संपवलं, नेमकं कारण काय?

मुंबई तक

मेरठमधील एका सहा महिन्यांच्या निष्पाप बालकाच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. या पोलीस तपासात समोर आलेल्या धक्कादायक वास्तवाने आईची ममता, नातेसंबंध आणि माणुसकीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवरा कामानिमित्त परराज्यात

point

इकडे बायकोने 6 महिन्यांच्या मुलाला संपवलं

point

कारण वाचून हादरुन जाल

Crime News : नातेसंबंध आणि माणुसकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सहा महिन्यांच्या निष्पाप बालकाच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. अवघ्या सहा महिन्यांचा चिमुरडा साहिल याला आपल्या आईच्या अनैतिक संबंधांची किंमत स्वतःचा जीव देऊन चुकवावी लागली. इंस्टाग्रामवरून झालेली मैत्री, पुढे प्रेमात बदलली आणि त्यातूनच या निष्पाप बालकाचा दुर्दैवी बळी गेल्याचे उघडकीस आले आहे. मेरठमधील ही घटना आहे.

पती बाहेर, पत्नीचे घरात वेगळेच कारनामे

या प्रकरणातील मृत बालक साहिल हा सहारनपूर जिल्ह्यातील रहिवासी इम्रान आणि शबाना यांचा मुलगा होता. इम्रान हा पंजाबमधील एका राईस मिलमध्ये मजुरीचे काम करतो. तो घराबाहेर असताना शबाना हिची इंस्टाग्रामवर विशाल कुमार नावाच्या तरुणाशी ओळख झाली. हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. 12 जुलैच्या रात्री शबाना औषध आणण्याच्या बहाण्याने मुलाला घेऊन बस स्थानकावर पोहोचली, जिथे विशाल आधीच तिची वाट पाहत होता.

हे ही वाचा : 'स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नाही', पुण्यात आल्यावर अजित डोवालांनी टोचले Gen-Z चे कान

मुलाचं काय करायचं?

तिथे पोहोचल्यानंतर विशालने शबानाला पटवून दिले की, जर हे मूल सोबत राहिले तर त्यांचे कुटुंब या नात्याला स्वीकारणार नाही. मुलाला एका परिचित व्यक्तीकडे सुरक्षित सोडून येतो, असे सांगून तो चिमुरड्या साहिलला सोबत घेऊन गेला. त्यानंतर विशालने एका कॉलनीजवळ नेऊन बालकाचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह उघड्या नाल्यात फेकून दिला. यानंतर तो शबानाकडे परतला आणि तिला हापूर येथील आपल्या घरी घेऊन गेला. 13 जुलै रोजी एका कचरा वेचणाऱ्या व्यक्तीला नाल्यात मृतदेह आढळून आल्यावर पोलीस तपास सुरू झाला.

हे ही वाचा : 'तो' एक क्षण अन्.. 'राज'पुत्राचं नेमकं चुकलं तरी काय? ट्रोलिंग आणि बरंच काही!

वडिलांनी चिमुरड्याला ओळखले

दुसरीकडे, पंजाबवरून परतलेल्या इम्रानने पत्नी आणि मुलगा गायब असल्याचे पाहून पोलिसांत तक्रार नोंदवली. तपासादरम्यान पोलिसांनी शबानाला हापूरमधून ताब्यात घेतले. मुलाबाबत विचारणा केली असता विशालने त्याला मित्राकडे ठेवल्याचे तिने सांगितले. परंतु, दरम्यानच्या काळात मेरठमध्ये मिळालेल्या अज्ञात बालकाच्या मृतदेहाची माहिती मिळताच इम्रानने तिथे जाऊन कपडे आणि फोटोंवरून आपल्या पोटच्या गोळ्याला ओळखले. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी (31 जुलै) रात्री आरोपी विशालला अटक केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कारवाई सुरू आहे.