'तो' एक क्षण अन्.. 'राज'पुत्राचं नेमकं चुकलं तरी काय? ट्रोलिंग आणि बरंच काही!

रोहित गोळे

Amit Thackeray Speech: मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यक्रमात अमित ठाकरे काही क्षण भाषण विसरल्यानंतर स्टेजवरून खाली उतरले आणि त्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलिंगची लाट उसळली. राज ठाकरेंच्या प्रभावी वक्तृत्वाशी तुलना करत अमित ठाकरेंवर आता मीम्स आणि सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झालं आहे.

ADVERTISEMENT

mns chief raj thackerays son amit thackeray forgot his speech and stepped down from stage faces heavy trolling on social media
अमित ठाकरे
Google CTA

मुंबई: ज्या घरात भाषण म्हणजे कला मानली जाते, ज्या नेत्याचं प्रत्येक भाषण व्हायरल होतं, त्याच घरातील पुढच्या पिढीच्या नेत्याचं भाषण अर्ध्यातच थांबलं तर? मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात नेमकं हेच घडलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे काही क्षणांसाठी भाषण विसरले. त्यानंतर ते चक्क स्टेजवरून निघून गेले पण काही वेळाने पुन्हा येऊन त्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं. पण त्या काही सेकंदांनी सोशल मीडियावर मात्र अनेक मीम्स, टोमणे आणि चर्चेला उधाण आलंय.

अमित ठाकरे भाषण विसरले अन् स्टेजवरून खाली उतरले...

मुंबईत मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अमित ठाकरे उपस्थित होते. भाषण सुरू असताना ते काही क्षण थांबले. पुढे काय बोलायचं हे आठवत नसल्याचं दिसून आलं. त्यानंतर ते व्यासपीठावरून खाली उतरले. काही वेळाने पुन्हा स्टेजवर आले आणि आपलं उर्वरित भाषण पूर्ण केलं.

हे ही वाचा>> "मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट्स बघायचेत", राज ठाकरेंनी तंत्रशिक्षण मंत्र्यांची काढली पिसं

राजकारणात अशा घटना काही नवीन नाहीत. अनेक अनुभवी नेतेही कधी नोट्स पाहतात, कधी भाषणात अडखळतात, तर कधी शब्द चुकतात. मात्र अमित ठाकरेंच्या बाबतीत ही घटना वेगळी ठरली. कारण त्यांची तुलना थेट त्यांचे वडील राज ठाकरे यांच्याशी केली जाते.

मग काय सोशल मीडियावरही ट्रोलर्सची फौज आपसूकच उभी राहिली... कुणी म्हणालं, "राज ठाकरेंच्या घरात भाषणाचं Wi-Fi थोडावेळ डिस्कनेक्ट झालं."