होणाऱ्या नवऱ्यासमोर तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, हात स्कार्फने बांधून गुप्तांगावर मारहाण
crime news : एका तरुणीसह तिच्या होणाऱ्या नवऱ्याला लुटण्यात आले होते. हल्लेखोरांनी त्यांना रस्त्याच्या कडेच्या जंगलात ओढून नेले आणि महिलेवर सामहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने प्रतिकार केला असता, तिला मारहाण करण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जंगलात लपून बसलेल्या सहा-सात गुंडांकडून जोडप्यांवर हल्ला
तरुणीचे हात स्कार्फने बांधून गुप्तांगावर कठीणे मारहाण
Crime News : मध्य प्रदेशातील गुना येथील राष्ट्रीय महामार्ग 46 वर घडलेल्या एका खळबळजनक घटनेनं परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. संबंधित प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंडमधील एका तरुणीसह तिच्या होणाऱ्या नवऱ्याला लुटण्यात आले होते. हल्लेखोरांनी त्यांना रस्त्याच्या कडेच्या जंगलात ओढून नेले आणि महिलेवर सामहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने प्रतिकार केला असता, तिला मारहाण करण्यात आली. महिलेनं आरडाओरड करत घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा : श्रावण महिन्यात शनिदेवाच्या गतीत बदल, रेवती नक्षत्रातील प्रवेशानं 'या' राशींचे भाग्य उजळणार
जंगलात लपून बसलेल्या सहा-सात गुंडांकडून जोडप्यांवर हल्ला
पोलिसांच्या माहितीनुसार, रघोघर येथील एका प्लांटमध्ये अभियंता असलेली एक पीडित तरुणी, टेकडी मंदिराला भेट देऊन आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत बाईकवरून येत होती. राष्ट्रीय महामार्ग 46 वर त्यांच्या बाईकचे टायर पंक्चर झाले. मदतीची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभे असताना, जंगलात लपून बसलेल्या सहा-सात गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला.
या घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही जखमींना रुग्णालयात नेण्यात आले होते. पोलिसांनी तात्काळपणे परिसर सील केला आणि जंगलातील शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. प्राथमिक तपासानंतर, आरोपीचा शोध घेण्यासाठी काही पथके तयार करण्यात आली होती.
तरुणीचे हात स्कार्फने बांधून गुप्तांगावर कठीणे मारहाण
हल्लेखोरांनी तरुणावर हल्ला केला आणि तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न केला होता. तरुणीचे हात स्कार्फने बांधण्यात आले आणि तिच्या गुप्तांगावर कठीणे मारहाण करण्यात आली. जेव्हा तरुणाने विरोध केला असता, त्याला देखील मारहाण केली. या घटनेनंतर डायल करण्यात आलेल्या 112 नंबरवर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही पुरूषांना रुग्णालयात पाठवण्यात आले. नंतर गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी एक पथक जंगलात पाठवण्यात आले होते.
