चॅनेल बदलण्यावरून वाद, पत्नीने नवऱ्यावर विळ्याने हल्ला करत.. भयंकर घडलं
Crime News : घरात टिव्ही सुरू असताना नवऱ्याने चॅनेल बदलण्यासाठी रिमोट घेतला आणि आपल्या आवडीचा चॅनेल सुरू केला. चॅनेलवरून नवरा-बायकोमध्ये मोठा वाद झाला होता. नंतर वादाचं मारहाणीत रुपांतर झालं. पत्नीने नवऱ्यावर विळ्याने हल्ला केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवऱ्याने चॅनेल बदलण्यासाठी घेतला रिमोट
नेलवरून नवरा-बायकोमध्ये मोठा वाद
पत्नीचा नवऱ्यावर विळ्याने हल्ला
Crime News : घरात टिव्ही सुरू असताना नवऱ्याने चॅनेल बदलण्यासाठी रिमोट घेतला आणि आपल्या आवडीचा चॅनेल सुरू केला. चॅनेलवरून नवरा-बायकोमध्ये मोठा वाद झाला होता. नंतर वादाचं मारहाणीत रुपांतर झालं. पत्नीने नवऱ्यावर विळ्याने हल्ला केला, या हल्ल्यात पतीला मोठी जखम झाली असून त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे. ही घटना मध्य प्रदेशातील भोपाळच्या छोला मंदिर परिसरातील आहे.
हे ही वाचा : 16 वर्षीय मेहुणीवर दाजीकडून लैंगिक अत्याचार, नात्याला काळिमा फासणारा प्रकार
चॅनेल बदलण्यावरून नवरा-बायकोत वाद
पोलिसांनुसार, एक मजुर हा आपल्या घरात टीव्ही बघत होता. याचदरम्यान, त्याने टिव्हीचा चॅनेल लावला होता, हीच बाब पत्नीला आवडली नव्हती. सुरूवातीला दोघांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. दोघांमधील आवाजाची पातळी वाढू लागली होती. दोघांमधील वाद विकोपाला गेला नंतर राग इतका अनावर झाला की पत्नीने घरातील विळ्याने उचलून पतीवर हल्ला केला.
बायकोने केलेल्या हल्ल्यात नवरा जखमी
विळ्याचा घाव हा थेट डोक्यावर आणि गालावर लागल्याचे दिसून आले. पतीच्या शरीरातून रक्त वाहू लागले होते. गोंधळ ऐकून परिसरातील लोक घटनास्थळी दाखल झाले. जखमी पुरूषाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्याच्यावर उपचार सुरू ठेवण्यात आलेत. संबंधित घटनेची माहिती मिळताच, चोळ मंदिर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध घेतला. पीडिताचा जबाब नोंदवण्यात आला आणि पत्नीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून स्थानिकांच्या म्हणण्यांनुसार, पती-पत्नीत यापूर्वीही क्षुल्लक कारणांवरून वाद झाले होते. पती मजूर असून या जोडप्याला दोन मुले आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
