पैसा-पाणी : बेरोजगारांसाठी आणलेल्या मोदी सरकारच्या योजनेचं काय झालं? पाहा आकडेवारी

मुंबई तक

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत दोन वर्षांत केवळ 26 हजार तरुणांना इंटर्नशिप मिळाली आहे. योजनेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढील 3 वर्षांत 99 लाखांहून अधिक तरुणांना इंटर्नशिप द्यावी लागेल

ADVERTISEMENT

paisa pani blog milind khandekar
paisa pani blog milind khandekar
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पैसा-पाणी : बेरोजगारांसाठी आणलेली मोदी सरकारची योजना फेल?

point

आकडेवारी काय सांगते?

मोदी सरकारने जुलै 2024 मध्ये अर्थसंकल्पात "पंतप्रधान इंटर्नशिप योजना" ही योजना आणली होती. मात्र, या योजनेचे उद्दिष्ट आणि प्रत्यक्षातील आकडेवारीत मोठी तफावत दिसून येत आहे. 5 वर्षांत 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देण्याचे आश्वासन देणाऱ्या या योजनेंतर्गत गेल्या 2 वर्षांत केवळ 26 हजार तरुणांनाच इंटर्नशिप मिळाली आहे. ही योजना काय आहे? या योजनेचं उद्दिष्ट काय? आणि आता वस्तुस्थिती काय? जाणून घेऊयात.. 

पंतप्रधान इंटर्नशिप योजना काय होती?

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाही. त्यावेळी युवकांचा असंतोष हे एक महत्त्वाचे कारण मानले गेलं. याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलै 2024 च्या अर्थसंकल्पात युवकांसाठी पॅकेजची घोषणा केली.  त्यातीलच एक मोठी घोषणा होती "पंतप्रधान इंटर्नशिप योजना"

या योजनेचे स्वरूप काय होतं?

यामध्ये 500 मोठ्या कंपन्यांमध्ये 12 महिन्यांची इंटर्नशिप देण्याचा मानस होता. त्यासाठी तरुणांना दर महिन्यास 5,000 रुपयांचा स्टायपंड देण्यात येणार होता. त्यात ₹500 रुपये हे कंपनी तर ₹4,500 रुपये हे सरकारकडून देण्यात येणार होते. या योजनेत कामाचा अनुभव आणि प्रशिक्षण कंपन्यांना देणे बंधनकारक होतं. आणि तरुणांच्या करिअरच्या सुरुवातीला उद्योगाचा अनुभव मिळावा हा योजनेचा प्रमुख उद्देश होता.