मुलगा मानसिक रुग्ण, विटेनं हल्ला करत आईची हत्या; बहिणीला देखील सोडलं नाही

मुंबई तक

Crime News : मानिसकदृष्ट्या आजारी असलेल्या तरुणाने आपल्या आईच्या डोक्यात विटेने हल्ला करत हत्या केली. नंतर आपल्या बहिणीवर देखील जीवघेणा हल्ला केला होता. पीडितांचा किंचाळण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुलगा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ

point

तरुणाने आईला संपवलं

Crime News : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद ठाणे परिसरातील शमशाबाद येथे मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मानिसकदृष्ट्या आजारी असलेल्या तरुणाने आपल्या आईच्या डोक्यात विटेने हल्ला करत हत्या केली. नंतर आपल्या बहिणीवर देखील जीवघेणा हल्ला केला होता. पीडितांचा किंचाळण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते. तब्बल दीड तासानंतर आरोपी तरुणाला ग्रामस्थांनी ताब्यात घेतलं. 

हे ही वाचा : महिला शिक्षिकेवर तरुणाकडून लैंगिक अत्याचार, नवऱ्याला संपवण्याची धमकी

या घटनेची सूचना मिळताच, अपर पोलीस अधीक्षक गिरीश कुमार, क्षेत्राधिकारी कायमगंज राजेश द्विवेदी, ठाणे शमशाबाद पोलीस किंवा फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावर जाऊन तपास केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. 

मानसिकदृष्ट्या अस्वस्थ लेकाकडून आईला मारहाण 

गावातील प्रधान गंगावरच्या माहितीनुसार, आरोपी तरुण मागील दोन-तीन दिवसांपासून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. पोलीस अधीक्षक गिरीश कुमार यांनी सांगितलं की, 112 नंबरवरून फोन आला आणि एक तरुण आपल्या आईला मारहाण करत असल्याची माहिती दिली. नंतर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. प्राथमिक माहितीच्या तपासातून आई आणि मुलामध्ये वाद झाला होता. महिलेला गंभीरपणे जखमा झाल्या होत्या आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

हे ही वाचा : बायकोचे दोन दिरांसोबत संबंध, नवऱ्याला संपवण्यासाठी जेवणात विष मिसळल्याचा आरोप

आरोपीवर पाच वर्षांपासून मानसिक उपचार

पुढे त्यांनी सांगितलं की, फील्ड युनिटला तात्काळपणे घटनास्थळी बोलावण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेत बहीण आणि आरोपी मुलगा जखमी झाला होता. दरम्यान, आरोपीवर पाच वर्षांपासून मानसिक उपचार सुरू होता. या प्रकरणाचा पोलीस पुढील शोध घेत आहेत.