Personal Finance: जुना फ्लॅट विकताना कोणत्या चुकांमुळे होतं सर्वाधिक नुकसान?
Old Flat Selling Tips: जुना फ्लॅट विकताना चुकीची किंमत, कागदपत्रांतील त्रुटी, कॅपिटल गेन टॅक्स, दुरुस्ती आणि वाटाघाटींमधील चुका यामुळे लाखोंचं नुकसान होऊ शकतं. फ्लॅट विकण्यापूर्वी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं ते जाणून घ्या.
ADVERTISEMENT

Personal Finance Old Flat Selling Tips: घर ही अनेकांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक गुंतवणूक असते. मात्र फ्लॅट खरेदी करताना जितकी काळजी घेतली जाते, तितकीच काळजी तो विकतानाही घेणं आवश्यक असतं. अनेक जण घाई, चुकीची माहिती किंवा योग्य आर्थिक नियोजनाच्या अभावामुळे स्वतःच्या मालमत्तेची किंमत कमी करून विकतात किंवा अनावश्यक कर भरावा लागतो. परिणामी लाखो रुपयांचं नुकसान होऊ शकतं.जर तुम्ही जुना फ्लॅट विकण्याचा विचार करत असाल, तर खालील चुका टाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
1. बाजारभावाचा अभ्यास न करता किंमत ठरवणं
अनेक विक्रेते शेजाऱ्यांच्या सांगण्यावर किंवा अंदाजावर किंमत ठरवतात. यामुळे फ्लॅट कमी किंमतीत विकला जाऊ शकतो किंवा अवास्तव किंमत ठेवल्याने खरेदीदार मिळत नाही.
काय करायला हवं?
- परिसरातील अलीकडील व्यवहार तपासा.
- समान क्षेत्रफळ आणि सुविधांच्या फ्लॅटची तुलना करा.
- आवश्यक असल्यास व्यावसायिक मूल्यांकन करून घ्या.
2. फ्लॅटची दुरुस्ती न करता विक्री
लहानसहान दोषही खरेदीदाराच्या निर्णयावर परिणाम करू शकतात. गळती, खराब रंगकाम किंवा तुटलेले फिटिंग्स यामुळे किंमत कमी करण्याची मागणी होते.
