भागवतांना का ठेवावा लागतोय Gen Z वर डोळे झाकून विश्वास.. 'ही' RSS-भाजपची अगतिकता की स्मार्ट राजकारण?
देशभरातील Gen Z आंदोलनांनंतर RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी "Gen Z वर माझा डोळे झाकून विश्वास आहे" असे वक्तव्य केले. आता हे विधान भाजपची किंवा RSS ची अगतिकता आहे की, स्मार्ट राजकारण याचं विश्लेषण जाणून घ्या.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
यापुढे राजकारणातील निर्णायक मतदारवर्ग Gen Z
युवकांच्या आंदोलनांनी सरकारला दिला नवा संदेश
मोहन भागवतांना का Gen Z ला गोंजारावं लागलं?
मुंबई: देशभरात गेल्या महिन्यांत विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे युवक आणि Gen Z पिढीने विविध प्रश्नांवर मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले. परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, रोजगार, शिक्षणातील पारदर्शकता आणि सरकारची भूमिका या मुद्द्यांवर तरुणांनी रस्त्यावर उतरून अत्यंत अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सरकासमोर आपल्या मागण्या मांडल्या. ज्यामुळे भाजपचे केंद्रीय मंत्री असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे तरुण आणि विशेषत: Gen Z ची ताकद काय आहे हे सत्ताधाऱ्यांना जाणवू लागलं आहे.
अशावेळी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी "Gen Z वर माझा डोळे झाकून विश्वास आहे" असे वक्तव्य केलं. आता हे विधान केवळ प्रेरणादायी आहे की, त्यामागे व्यापक राजकीय संदेश आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. याचंचं विश्लेषण आपण जाणून घेऊया.
Gen Z का ठरली राजकारणाचा केंद्रबिंदू?
भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. पुढील काही वर्षांत कोट्यवधी तरूण प्रथमच मतदान करणार आहेत. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षासाठी किंवा वैचारिक संघटनेसाठी हा मतदार वर्ग अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
हे ही वाचा>> 'मी Gen Z वर डोळे बंद करून विश्वास ठेवेन', आंदोलन आणि लाठीचार्जच्या प्रश्नावर मोहन भागवत असं का म्हणाले?
आजची तरुण पिढी ही केवळ प्रचारावर विश्वास ठेवत नाही. तर ते सरकारलाही प्रश्न विचारतात आणि विरोधका देखील. सोशल मीडिया, डिजिटल माध्यमे आणि स्वतंत्र माहितीच्या आधारे स्वत:चं ठाम मत तयार करणारी ही पिढी पारंपरिक मतदारांपेक्षा निश्चितच वेगळ्या जनरेशनची आहे.
