16 वर्षीय मुलीचा शिक्षकाच्या खोलीत शिपायाकडून विनयभंग, आरोपी अटकेत
Crime news : एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची दुर्दैवी घटना आहे. विद्यार्थीनी शिक्षिकेला विचारून वही आणण्यासाठी तिच्या घरी आली होती. घटनेदरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या शिपायाने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुस्तक आणण्यासाठी कार्यालयात गेलेल्या विद्यार्थीनीवर शिपायाकडून घृणास्पद कृत्य
आरोपीने गुन्ह्याचा दिला कबुलीनामा
Crime news : पंजाबच्या लुधियानातून एका शाळेत लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची दुर्दैवी घटना आहे. विद्यार्थीनी शिक्षिकेला विचारून वही आणण्यासाठी तिच्या घरी आली होती. घटनेदरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या शिपायाने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आरोपी शिपायाने विद्यार्थ्याला पकडले, नंतर चुंबन घेतले आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श केला.
हे ही वाचा : नागपूर: विद्यार्थिनीला पाठवले अश्लील मेसेज, सिम्बायोसिस लॉ कॉलेजच्या प्रोफेसरचं लज्जास्पद कृत्य
आरोपीने गुन्ह्याचा दिला कबुलीनामा
पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार विद्यार्थिनीने सांगितलं की, आरोपीने तिचे चित्रिकरण केले होते. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, लुधियानाच्या टिब्बा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आरोपीची प्रिन्स पाल अशी ओळख समोर आली आहे. पोलिसांनी प्रिन्स पॉलची कसून चौकशी केली असून आरोपीने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला होता.
पुस्तक आणण्यासाठी कार्यालयात गेलेल्या विद्यार्थीनीवर शिपायाकडून घृणास्पद कृत्य
पीडितेनं पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले की, हा धक्कादायक प्रकार 13 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी घडला होता. तिला त्याच दिवशी शाळेत पुस्तकं हवी होती. तिने शिक्षिकेकडे पुस्तकांची देखील मागणी केली होती, तेव्हा शिक्षकांनी ते पुस्तक कार्यालयातून आणण्यास सांगितले होते. त्यानंतर विद्यार्थिनी शिक्षकाच्या संबंधित कार्यालयात गेली असता, आरोपी शिपायाने हे घृणास्पद केल्याचे कृत्य आहे.
हे ही वाचा : पालघर हादरलं! पोटच्या मुलाने बापाचा गळा चिरून केली हत्या, घटनेनं परिसरात खळबळ
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑक्टोबर रोजी अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी तात्काळपणे पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि धाड टाकून आरोपीला अटक केली.
