तरुणाच्या गुप्तांगात कंप्रेसर पाईपनं हवा भरली, नंतर पोटातील आतडी...

मुंबई तक

Crime news : एका खाजगी कंपनीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दोन कर्मचाऱ्यांनी जुन्या वादातून एका सहकारी कर्मचाऱ्याच्या गुप्तांगात पाईप कंप्रेसरने हवा भरली, या घटनेनं परिसर हादरून गेला.

ADVERTISEMENT

Crime news
Crime news
google news

बातम्या हायलाइट

point

तरुणाच्या गुत्पांगात कंप्रेसर पाईपने हवा भरली

point

पोटात हवा गेल्याने आतडी तुटली

Crime news : भारतीय यमुना प्राधिकरणाच्या सेक्टर 29 मध्ये असलेल्या एका खाजगी कंपनीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दोन कर्मचाऱ्यांनी जुन्या वादातून एका सहकारी कर्मचाऱ्याच्या गुप्तांगात पाईप कंप्रेसरने हवा भरली. या प्रकरणाची सूर्या ग्लोबल फ्लेक्सी फिल्म कंपनीचे प्लांट हेड धर्मेंद्र सिंग यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. 

हे ही वाचा : विद्यार्थी परीक्षेत नापास, 11 एक्सपायर्ड गोळ्या खाल्ल्या अन्..

त्यांनी तक्रारीत म्हटलं की, समीर, दिलशाद आणि झीशान हे उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील काशीपूर भागातील एका गावातील रहिवासी होते. ते तिघेही एकाच कंपनीत कंत्राटीवर काम करत होते. 

तरुणाच्या गुत्पांगात कंप्रेसर पाईपने हवा भरली

काहीच दिवसांपूर्वी समीरचा दिलशाद आणि झीशानसोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. मंगळवारी कंपनीत काम करताना, समीर झाडू मारण्यासाठी वाकला असता, दिलशाद आणि झीशानने मिळून त्याच्या गुत्पांगात कंप्रेसर पाईपने हवा भरली. 

हे ही वाचा : बायकोच्या ज्यूसमध्ये उंदीर मारण्याचे औषध, विधवा महिलेशी संबंध..

पोटात हवा गेल्याने आतडी तुटली

आरोपीने समीरला ठार मारण्याच्या उद्देशानेच हे कृत्य केल्याचा पीडिताचा आरोप आहे. पोटात हवा गेल्याने समीरची आतडी तुटली. गंभीर अवस्थेत समीवर ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

हे वाचलं का?