9 वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, पण आता तरुणावर जीव जडला, नवऱ्याच्या नरड्यावर सूरी फिरवली!
Crime News : एका व्यावसायिकाची पत्नीने चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, अनैतिक संबंधांतून हे कृत्य घडल्याचा आरोप मृताच्या वडिलांनी केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
9 वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, पण आता तरुणावर जीव जडला
नवऱ्याच्या नरड्यावर सूरी फिरवली!
Crime News : एका 45 वर्षीय व्यावसायिकाची हत्या झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मनीष गुप्ता असे मृत व्यावसायिकाचे नाव असून, त्यांच्या पत्नीने निहारिका गुप्ता हिने चाकूने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर 11 दिवसांच्या उपचारांनंतर मनीष यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. सुरुवातीला हा वाद घरगुती वाटत असला, तरी आता या प्रकरणात अनैतिक संबंधांचा अँगल समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी पत्नी निहारिकाला पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात अटक केली असून, पोलीस आता सर्व बाजूने तपास करत आहेत.
हेही वाचा : खासदारानंतर आता ठाकरेंचे आमदार फुटणारच, भाजप आमदाराच्या वक्तव्याने खळबळ
निहारिकाला मनीषवर हल्ला करण्यास प्रवृत्त केल्याचे समोर
मनीष आणि निहारिका यांचा विवाह 2017 मध्ये झाला होता आणि त्यांना एक सहा वर्षांचा मुलगाही आहे. सुरुवातीला सर्वकाही सुरळीत सुरू असताना, गेल्या तीन वर्षांपासून निहारिकाचे जम्मूतील एका तरुणाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंध असल्याचे मनीष यांना समजले. यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. 5 जून रोजी पुन्हा एकदा मोबाईलवरून झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक वळणात झाले. मनीष यांच्या वडिलांनी केलेल्या आरोपानुसार, वादाच्या वेळी निहारिकाचा प्रियकर फोनवर होता आणि त्यानेच निहारिकाला मनीषवर हल्ला करण्यास प्रवृत्त केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कानपूरच्या फीलखाना पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली.
हेही वाचा : शेजारच्या विधवेला चहाला बोलावलं अन् केलं कांड, हात-पाय एकीकडे, शीर दुसरीकडे









