'मला बायकोपासून वाचवा', त्रासलेल्या पतीने व्याकूळ होऊन काय सांगितलं?
Crime News : पत्नीच्या छळाला कंटाळून एका पतीने चक्क एसएसपी कार्यालयात धाव घेतली असून, पत्नी आणि तिचे कुटुंबीय लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याचा धक्कादायक आरोप त्याने केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'मला बायकोपासून वाचवा',
त्रासलेल्या पतीने व्याकूळ होऊन काय सांगितलं?
Crime News : ग्वाल्हेरमधील बिजौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. राहुल जाटव या युवकाने आपल्या पत्नीच्या कृत्यांमुळे हैराण होऊन थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली आहे. राहुलने केलेल्या तक्रारीनुसार, 14 एप्रिल 2026 रोजी त्याचे शिवपुरी येथील राखी जाटव हिच्याशी लग्न झाले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच पत्नीच्या संशयास्पद हालचालींमुळे राहुलच्या मनात शंका निर्माण झाली. पत्नी राखी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी लग्नाच्या नावाखाली सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत, अशी तक्रार त्याने याआधीही स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
हेही वाचा : 'तुमच्या मतदारसंघात जाऊन दाखवा..', संजय राऊतांनी फुटीर खासदारांना दम भरला
पत्नीला शस्त्रास्त्रांची प्रचंड आवड
राहुलच्या तक्रारीनुसार, 15 मे रोजी सासरी आलेली त्याची पत्नी राखी 23 मे रोजी कुणालाही न सांगता घर सोडून निघून गेली. त्यानंतर तिने आणि तिच्या नातेवाईकांनी राहुलला फोन करून 5 लाख रुपयांची मागणी केली आहे. जर ही रक्कम दिली नाही, तर त्याला खोट्या कायदेशीर प्रकरणात अडकवण्याची आणि कुटुंबाला समाजात बदनाम करण्याची धमकी दिली जात आहे. पत्नीला शस्त्रास्त्रांची प्रचंड आवड असून, तिने सोशल मीडियावर बंदुकांसोबत काढलेले अनेक फोटो राहुलने पुराव्यासाठी पोलिसांना दिले आहेत. इतकेच नव्हे, तर आपल्याला अनोळखी नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावाही राहुलने केला आहे.
हेही वाचा : ठाकरेंनी उमेदवारी दिल्यास 2029 ची लोकसभा लढणार आहात का? कैलास पाटील म्हणाले...









