मुंबईची खबर : मुंबईतील लोक रात्री चौपाटीवर जाऊन का झोपत आहेत?

मुंबई तक

सूर्य मावळताच मुंबईच्या वर्सोवा बीचचे स्वरूप बदलते. दिवसा जिथे लोक फिरताना आणि सेल्फी घेताना दिसतात, तीच जागा रात्री शेकडो कुटुंबांसाठी एक तात्पुरती झोपण्याची जागा बनते.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : मुंबईतील लोक रात्री समुद्रकिनाऱ्यावर जाऊन का झोपत आहेत?

Mumbai News : रात्रीचे 11 वाजले आहेत. मुंबईचा वर्सोवा बीच... समोर अथांग समुद्र आणि आल्हाददायक थंड हवा. या बीचवरील वाळूवर शेकडो लोक झोपलेले दिसतात. कोणी चादर अंथरत आहे, कोणी लहान मुलाला थोपटून झोपवत आहे, तर कोणी उशी नीट करत आहे. पहिल्या नजरेत हे दृश्य एखाद्या बीच फेस्टिव्हल किंवा पिकनिकसारखे वाटू शकते, पण यामागची खरी कहाणी अत्यंत वेदनादायी आहे. हे लोक इथे फिरण्यासाठी आलेले नाहीत, तर आपली घरे सोडून फक्त काही तास सुखाची झोप घेण्यासाठी आले आहेत. मुंबईच्या वर्सोवा भागात सध्या दररोज रात्री शेकडो लोक समुद्रकिनाऱ्यावर रात्र काढत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे मुंबईतील प्रचंड उष्णता आणि उकाडा, ज्यामुळे या लोकांची घरे आता राहण्यायोग्य उरलेली नाहीत.

उन्हामुळे पत्रे तापतात त्यामुळे...

वास्तविक पाहता, वर्सोवाच्या किनारपट्टी भागात मोठ्या संख्येने लोक पत्र्याच्या घरांमध्ये राहतात. दिवसभर पडणाऱ्या कडक उन्हामुळे हे पत्रे इतके तापतात की, रात्रीच्या वेळीही या खोल्या एखाद्या भट्ट्यांसारख्या धगधगत असतात. स्थानिक रहिवासी हरीश यादव सांगतात की, रात्रीच्या वेळी घराच्या आत श्वास घेणेही कठीण होऊन बसते. भिंती आणि छत इतके गरम असतात की, लहान मुले आणि वृद्धांसह घरात रात्र काढणे म्हणजे एखाद्या शिक्षेसारखे वाटते. त्यातच अजूनही म्हणावा तसा पाऊस झालेला नसल्याने हा उकाडा अधिकच वाढला आहे. याच कारणामुळे सूर्य मावळताच येथील चित्र पूर्णपणे बदलते. महिला, लहान मुले आणि वृद्ध हातात चटई, चादर आणि उशी घेऊन समुद्रकिनाऱ्याकडे चालू लागतात. वाळूवर आपली जागा शोधून खुल्या आकाशाखाली झोपण्याची त्यांची तयारी सुरू होते.

हे ही वाचा : 'कसली ही न्यायव्यवस्था?..' पवनराजे हत्याकांड निकालावर ठाकरेंचा 'तो' नेता संतापला

ओपन एअर बेडरुम

या समुद्रकिनाऱ्यावर एसी किंवा कुलर नाही, पण समुद्रावरुन येणारी थंड हवा आहे. हीच हवा या गरिबांसाठी रात्रभर दिलासा देणारे एकमेव साधन बनते. अर्थात, हा दिलासा देखील पूर्णपणे सुरक्षित आणि चिंतामुक्त नाही. उघड्यावर झोपल्यामुळे डास, कीटक आणि सुरक्षेच्या अनेक समस्या भेडसावत असतात. मात्र, स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, त्या तापलेल्या खोलीत रात्रभर कूस बदलत त्रास करून घेण्यापेक्षा समुद्रकिनाऱ्यावर काही तास शांततेची झोप मिळणे कधीही उत्तम. सकाळी उजाडताच ही तात्पुरती 'ओपन एअर बेडरूम' पुन्हा गायब होते. लोक आपली अंथरुणे गुंडाळतात आणि परत त्याच घरात निघून जातात, ज्या घरांपासून सुटका मिळवण्यासाठी त्यांनी रात्रभर बीचवर आश्रय घेतला होता.

हे ही वाचा : 'कलयुगात वाईटाला बळ...' पवनराजे हत्याकांडाच्या निकालावर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया

गरीब-श्रीमंत दरी

वर्सोवा बीचवरील हे दृश्य केवळ वाढत्या उष्णतेची कहाणी सांगत नाही, तर ती मुंबईच्या दोन वेगवेगळ्या जगाची भीषण वास्तविकता समोर आणते. एका बाजूला मुंबईतील उंचच उंच इमारती आहेत, जिथे एसीच्या थंड हवेत लोकांची रात्र आरामात जाते. तर दुसऱ्या बाजूला हे असे लोक आहेत, ज्यांच्यासाठी एक वेळची शांत झोप मिळवणे हा देखील एक मोठा संघर्ष बनला आहे. मायानगरी मुंबईतील हा विरोधाभास मनाला चटका लावणारा आहे. एकाच शहरात एका बाजूला अब्जावधी रुपयांचे सी-फेसिंग अपार्टमेंट्स आहेत, ज्यांच्या खिडक्यांमागे एसी सुरू असतात; आणि दुसऱ्या बाजूला त्याच इमारतींच्या सावलीत राहणारे हे लोक आहेत, ज्यांच्यासाठी रात्रीची सुखाची झोप ही एक मोठी 'लग्झरी' बनली आहे.
 

हे वाचलं का?