Maharashtra weather : राज्यात उष्णतेची लाट, कधी पडणार पाऊस?

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात जून महिना संपत आला असून अद्याप पावसाचा पत्ता नाही. मान्सून कोकणातून पुढे सरकताना दिसत नाहीये. अशातच राज्यातील वातावरण उष्ण आणि दमट दिसून येतंय.  अशातच उकाड्यात माणूस हैराण झाले. हवामान खात्याने हवामानाबाबत पुढे  माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात जून महिना संपत आला असून अद्याप पावसाचा पत्ता नाही

point

मान्सून कोकणातून पुढे सरकताना दिसत नाही

Maharashtra Weather : राज्यात जून महिना संपत आला असून अद्याप पावसाचा पत्ता नाही. मान्सून कोकणातून पुढे सरकताना दिसत नाहीये. अशातच राज्यातील वातावरण उष्ण आणि दमट दिसून येतंय.  अशातच उकाड्यात माणूस हैराण झाले. हवामान खात्याने हवामानाबाबत पुढे  माहिती दिली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट तर काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आढळून येते, अशातच 18 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे वर्तवण्यात आला आहे. 

हे ही वाचा : विद्यार्थी परीक्षेत नापास, 11 एक्सपायर्ड गोळ्या खाल्ल्या अन्..

कोकण 

कोकणात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान राहणार असून दुपारी पावसाचा अलर्ट वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्टची शक्यता आहे. तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव, नाशिक तुरळक भागांमध्ये उष्णतेची लाट, तर संध्याकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. तसेच अहिल्यानगरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे शहरात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. सोलापूरमध्ये उष्णतेची लाट पसरणार असल्याचा अंदाज आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे.