उद्धव ठाकरे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात, दौरा ठरला; निशाण्यावर कोण?

मुंबई तक

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात चार दिवसांचा दौरा करणार; पक्षाला बळकट करण्यासाठी 'मिशन'ला सुरुवात.

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात

point

दौरा ठरला; निशाण्यावर कोण?

Uddhav Thackeray : ठाकरेंचे सहा खासदार फुटल्यानं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) पक्षाचे सहा लोकसभा खासदार फुटून एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याने राज्याच्या राजकारणाचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला असून, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या राजकीय ताकदीत मोठी वाढ झाली आहे. या बंडखोरीचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावरही दिसून येत असून, एनडीए आघाडीमध्ये एकनाथ शिंदे गटाचे महत्त्व आणि प्रभाव वाढला आहे. यामुळे केंद्र सरकारची इतर मित्रपक्षांवरील अवलंबून राहण्याची गरज थोडीशी कमी झाली आहे.

हेही वाचा : बायकोनं सोडल्यावर संन्यास घेतला, आता आश्रमाच्या मागे सापडली बॉडी, साधूला कुणी संपवलं?

पक्ष पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी ठाकरेंचा दौरा 

या राजकीय भूकंपाला तोंड देण्यासाठी आणि पक्ष पुन्हा एकदा तळागाळापासून मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. ज्या सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, त्यांच्याच मतदारसंघात जाऊन आता ठाकरे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. 26 जून ते 29 जून या कालावधीत उद्धव ठाकरे या मतदारसंघांचा दौरा करणार असून, कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात उद्या, 26 जून रोजी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भांडुप आणि घाटकोपर येथील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींनी होणार आहे, जिथून ते बंडखोर खासदारांना थेट आव्हान देण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 19 वर्षीय मुलीने आंतरजातीय विवाह केला, आईने गोड बोलून घरी नेलं अन्...

हे वाचलं का?