नवरा कामावर गेला, घरात बायको आणि प्रियकर एकत्रच अन्..

मुंबई तक

Crime News : आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आईने प्रियकराला हाताशी घेऊन आपल्याच 2 वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केली. त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे भासवून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र, 20 दिवसांनंतर या पापाचा पर्दाफाश झाला आणि पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

नवरा कामावर गेला आणि घरात बायको प्रियकरासोबत होती अन्.. 

point

दोन वर्षांच्या मुलगा दोघांच्या नातेसंबंधात अडथळा

Crime News : तेलंगणाच्या मेडचल जिल्ह्यातील आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आईने प्रियकराला हाताशी घेऊन आपल्याच 2 वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केली. त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे भासवून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र, 20 दिवसांनंतर या पापाचा पर्दाफाश झाला आणि पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही भीषण घटना तेलंगणाच्या कीसारा पोलीस ठाणे परिसरात घडली. 

हे ही वाचा : नर्तकीला बघताच तरुणांची नियत बिघडली, स्टेजवरून ओढत निर्जनस्थळी नेलं अन्..

मूळचे सिद्दिपेट जिल्ह्यातील दगदेवपूर मंडळातील तीगुल रहिवासी असलेले स्वामी आणि ज्योती सध्या मेडचल जिल्ह्यातील कीसारा येथे राहत होते. स्वामी टॅक्सी चालक होते आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा होता. 

नवरा कामावर गेला आणि घरात बायको प्रियकरासोबत होती अन्.. 

पोलिसांच्या माहितीनुसार, ज्योतीचे लग्नापूर्वी यादद्री भुवनगिरी जिल्ह्यातील माधापुर गावातील रहिवासी असलेल्या नवीन नावाच्या तरुणासोबत प्रेम प्रकरण होते. लग्नानंतर ज्योतीने नवीनशी नाते तोडले नव्हते. जेव्हा पती स्वामी हा टॅक्सी घेऊन जायचा तेव्हा नवीन ज्योतीच्या घरी यायचा. 29 मे रोजी देखील असाच प्रकार घडला होता. दोघे घरात एकत्र होते त्यावेळी दोन वर्षांचा मुलगा जोराने रडू लागला होता. 

दोन वर्षांच्या मुलगा दोघांच्या नातेसंबंधात अडथळा

मुलाच्या रडण्याने ज्योती आणि प्रियकर नवीनच्या एकांतात व्यत्यय आला. मुलगा दोघांच्या नातेसंबंधात अडथळा ठरत होता, म्हणून दोघांनी चिमुरड्या हरिकृष्णाचे पाय पकडले, नंतर त्याला जमिनीवर आपटून जीवे मारलं. नंतर बेदम मारहाण केली. चिमुरड्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली आणि रक्त येऊ लागलं, इतक्यातच चिमुरड्याने अखेरच्या श्वास घेतला. 

हे वाचलं का?