पुण्यातून युगांडाच्या तीन महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, असं नेमकं काय केलंय तिघींनी?

पुण्यातील हिंजवडीमध्ये व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात वास्तव्य करणाऱ्या तीन युगांडाच्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ADVERTISEMENT

pune police detain three ugandan women over expired visas
प्रातिनिधिक फोटो
Google CTA

पुणे: पुणे जिल्ह्यात तीन युगांडाच्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिसाची मुदत संपल्यानंतरही युंगाडाच्या या तीनही महिला भारतातच राहत असल्याचं आढळून आलं. आता तिघींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या हद्दपारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, व्हिसाची मुदत संपल्यानंतर या तीन महिला भारतात राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. यानंतर, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मारुंजी येथील एका निवासी संकुलात मंगळवारी शोधमोहीम राबवण्यात आली आणि या तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलांची ओळख डोरेक अहैस्बिवे, प्रोसी अंकुंडा आणि अमिना कटुसिमे अशी पटली आहे. चौकशीदरम्यान, त्यांनी त्यांच्या मूळ पासपोर्ट आणि व्हिसाऐवजी फोटो कॉपी सादर केल्या.

त्यानंतर पोलिसांनी इमिग्रेशन, व्हिसा, फॉरेनर्स रजिस्ट्रेशन अँड ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे (Immigration, Visa, Foreigners Registration and Tracking System) त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली, आणि या तिन्ही महिला युगांडाच्या नागरिक असल्याची पुष्टी केली.

या तिन्ही महिलांनी व्हिसाची मुदत वाढवून घेतली नाही

पोलिसांनी सांगितले की, अहैसबिवे ही भारतात विद्यार्थी व्हिसावर राहत होती, जो फक्त 7 ऑक्टोबर 2026 पर्यंत वैध होता. अंकुंडाचा मेडिकल व्हिसा 29 डिसेंबर 2025 रोजी, तर कटुसिमेचा मेडिकल व्हिसा गेल्या वर्षी 11 नोव्हेंबर रोजी संपला होता.

हे ही वाचा>> 14 वर्षीय मुलीचा अर्धनग्नावस्थेत सापडला मृतदेह, 500 जणांच्या चौकशीनंतर धक्कादायक उलगडा

असे असूनही, या तिन्ही महिलांपैकी कोणीही आपला व्हिसा वाढवला नाही. त्यांना आता ताब्यात घेण्यात आले असून, पिंपरी-चिंचवड येथील परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयामार्फत त्यांना भारतातून हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हे ही वाचा>> विवाहित प्रेयसीच्या नादात आयुष्य केलं बरबाद, वडिलांची दगडाने ठेचून हत्या अन्...

ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विशेष शाखेच्या परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाने केली आहे. तपासानंतर, भारतात व्हिसाची मुदत संपल्यानंतरही वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांना ओळखण्याच्या निर्देशांनुसार या तिन्ही महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. तपासानंतर, या तिन्ही महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयामार्फत त्यांना भारतातून हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.