Govt Jobs : रेल्वेत 5,236 जागांसाठी मेगाभरती, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर

रेल्वेने पाच हजारहून अधिक पदांसाठी मेगाभरती जाहीर केली आहे. पदवीधर आणि बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना ही सुवर्णसंधी आहे.

ADVERTISEMENT

RRB Recruitment
RRB Recruitment
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

रेल्वेकडून मोठी भरती जाहीर

point

पदवीधर आणि बारावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

point

कसा कराल अर्ज?

RRB Recruitment : भारतीय रेल्वेने पदवीधर आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 5,236 विविध पदांची मोठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये पदवीधरांसाठी 3,548 जागा, तर बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1,688 जागा भरल्या जाणार आहेत. चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनिअर अकाउंट असिस्टंट, सिनियर क्लर्क, कमर्शियल क्लर्क, अकाउंट्स क्लर्क आणि ट्रेन्स क्लर्क यांसारख्या विविध पदांचा यात समावेश असून निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार निश्चित करण्यात आली आहे. पदवीधर पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक असून काही पदांसाठी संगणकावर इंग्रजी किंवा हिंदी टायपिंगचे ज्ञान असणे गरजेचे आहे. बारावी उत्तीर्ण पदांसाठी उमेदवाराने किमान 50% गुणांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी, तसेच लिपिक पदांसाठी संगणकीय टायपिंग आवश्यक आहे. वयाची अट 1 जानेवारी 2027 रोजी गणली जाईल. त्यानुसार पदवीधर पदांसाठी 18 ते 33 वर्षे आणि बारावी उत्तीर्ण पदांसाठी 18 ते 30 वर्षे वयोगट निश्चित करण्यात आला असून अनुसूचित जाती व जमाती (SC/ST) मधील उमेदवारांना 5 वर्षे तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा सूट देण्यात आली आहे.

हे ही वाचा : CJP च्या पत्रकार परिषदेत गोंधळ अन् घोषणाबाजी, नेहा बोरा बोलत असताना काय घडलं? दिपकेंनी चांगलंच सुनावलं!

'असा' करा अर्ज

या भरतीसाठी अर्जप्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. खुल्या आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 500 रुपये आहे, तर अनुसूचित जाती, जमाती, माजी सैनिक, ट्रान्सजेंडर, महिला आणि ईबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क आकारले जाईल. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून (rrb.indianrailways.gov.in) वेळेत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

हे ही वाचा : पूर्णेकर हत्या : 'हो.. मी मारेकऱ्यांना ओळखतो...', शिवसेना नगरसेविका मिनाक्षी शिंदेंच्या पतीचा खळबळजनक जबाब

अर्जाची शेवटची तारीख

ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी पदवीधर पदांसाठी शेवटची तारीख 6 नोव्हेंबर आहे, तर अर्ज दुरुस्तीसाठी 9 ते 18 नोव्हेंबरचा कालावधी दिला जाईल. बारावी उत्तीर्ण पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर असून अर्ज दुरुस्ती 16 ते 25 नोव्हेंबर दरम्यान करता येईल. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.