पूर्णेकर हत्या : 'हो.. मी मारेकऱ्यांना ओळखतो...', शिवसेना नगरसेविका मिनाक्षी शिंदेंच्या पतीचा खळबळजनक जबाब

Pradeep purnekar murder case : प्रदीप पूर्णकर हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. नगरसेविका मिनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांनी अटकेत असलेल्या आरोपींना ओळखत असल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली आहे. मात्र, पण हत्येशी संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

ADVERTISEMENT

Pradeep purnekar murder case
Pradeep purnekar murder case
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पूर्णेकर हत्या : 'हो.. मी मारेकऱ्यांना ओळखतो...',

point

शिवसेना नगरसेविका मिनाक्षी शिंदेंच्या पतीचा खळबळजनक जबाब

Pradeep purnekar murder case : ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णकर हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आलीये. "या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना आपण ओळखतो, ते माझ्याकडे काम मागायला यायचे", अशी कबुली नगरसेविका मिनाक्षी शिंदेंचे पती राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत दिलीये. मात्र, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी कोणताही संबंध नाही.  माझ्या पत्नी त्या भागातील नगरसेविका असल्याने आरोपींचे आमच्याकडे येणे-जाणे होते, असंही राजेंद्र शिंदे यांनी चौकशीत सांगितलंय. याबाबतचं वृत्त 'एबीपी माझा'ने दिलंय. 

हेही वाचा : वडिलांचा सरपंच होण्याचा हट्ट, मुलाचा अन् सुनेचा विरोध; शेवटी थरारक हत्याकांड

राजेंद्र शिंदे यांची दोन दिवस चौकशी 
 
राजेंद्र शिंदे यांची पोलिसांकडून सलग दोन दिवस चौकशी करण्यात आली. पहिल्या दिवशी नऊ तास, तर दुसऱ्या दिवशी आठ तास त्यांची चौकशी झाल्याची माहिती आहे. या चौकशीदरम्यान त्यांनी आरोपींना ओळखत असल्याचे मान्य केल्याचे सांगितले जात आहे. संबंधित आरोपी आणि राजेंद्र शिंदे हे एकाच परिसरात राहत असल्याने त्यांची ओळख होती, असे त्यांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. तसेच, त्यांची पत्नी मिनाक्षी शिंदे या संबंधित परिसरातील दोन ते तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या असल्याने आरोपींचे त्यांच्या घरी किंवा त्यांच्याकडे येणे-जाणे होते, असेही राजेंद्र शिंदे यांनी सांगितल्याचे समजते. 

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करताना पोलिसांनी न्यायालयात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीचा उल्लेख केल्याची माहिती आहे. त्यांची चौकशी सुरू असून, त्यातून आणखी काही महत्त्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता असल्याने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. राजेंद्र शिंदे यांच्या जबाबातून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची पुढील दिशा ठरवली जाऊ शकते. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी आणि राजेंद्र शिंदे यांच्यातील संबंधांची चौकशी पोलिसांसाठी महत्त्वाची ठरत आहे. राजेंद्र शिंदे यांची पुन्हा चौकशी करण्याची गरज भासल्यास त्यांना बोलावले जाईल, अशी माहितीही सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

मिनाक्षी शिंदे यांचीही चौकशी होण्याची शक्यता

दरम्यान, राजेंद्र शिंदे यांच्यानंतर त्यांच्या पत्नी मिनाक्षी शिंदे यांचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांना यापूर्वी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते; मात्र, त्या संबंधित दिवशी चौकशीसाठी आल्या नसल्याची माहिती आहे. राजेंद्र शिंदे यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता असतानाच, मिनाक्षी शिंदे पोलिसांसमोर हजर होणार का? याकडे लक्ष लागले आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास सुरू असून, राजेंद्र शिंदे यांच्या जबाबातून समोर आलेल्या माहितीची पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे. अटकेत असलेल्या आरोपींशी असलेली ओळख आहे, पण हत्येशी आपला संबंध नसल्याचा राजेंद्र शिंदे यांनी केलेला दावा या दोन्ही बाबींच्या पार्श्वभूमीवर पुढील चौकशीत काय माहिती समोर येते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.