पुणे : भुयारी मार्ग, उच्चभ्रू महिलांशी शारीरिक संबंध, कंडोम्स अन् गोळ्या

मुंबई तक

Pune Metro : वाघोलीतील एका आश्रमाच्या प्रमुखाविरोधात महिलेने दीर्घकाळ लैंगिक अत्याचार, छळ आणि धमकावल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी आश्रमावर छापा टाकत आठ जणांना ताब्यात घेतले.

ADVERTISEMENT

Pune Metro
Pune Metro
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे : भुयारी मार्ग, उच्चभ्रू महिलांशी शारीरिक संबंध, कंडोम्स अन् गोळ्या

point

दैवी शक्तीचा अवतार असल्याचे सांगून अत्याचार 

Pune Metro :  पुण्यातील वाघोली परिसरातील एका आश्रमातील बाबाविरोधात गंभीर आरोप झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे. तक्रारदार महिलेने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, या प्रकरणाची सुरुवात सुमारे 2000 सालापासून झाली. महिलेचे आई-वडील हरियाणातील एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने संबंधित बाबांच्या संपर्कात आले होते. त्यानंतर कुटुंबाची त्या बाबांवर श्रद्धा निर्माण झाली आणि त्यांचे आश्रमात नियमित येणे-जाणे सुरू झाले. तक्रारीनुसार, संबंधित बाबा राधामोहन मिश्रा यांनी कुटुंबाशी जवळीक वाढवत महिलेवर प्रभाव टाकण्यास सुरुवात केली. शिक्षणासाठी बाहेर गेलेल्या महिलेची आश्रमात वारंवार उपस्थिती राहावी यासाठी तिच्या वडिलांमार्फत संपर्क साधला जात असल्याचेही तिने म्हटले आहे. पुढे खाजगी भेटींच्या माध्यमातून तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत प्रश्न विचारले जात होते तसेच तिच्यावर मानसिक दबाव टाकला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

हेही वाचा : मातोश्रीचा निरोप, ठाकरेंचे 2 आमदार ओमराजेंच्या घरी, नेमकं काय घडलं?

दैवी शक्तीचा अवतार असल्याचे सांगून अत्याचार 

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, कालांतराने या वागणुकीचे स्वरूप अधिक गंभीर झाले. तिच्या इच्छेविरुद्ध मारहाण करण्यात आली, तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि स्वतःला दैवी शक्तीचा अवतार असल्याचे सांगून तिच्या मनात भीती निर्माण करण्यात आली. लग्नाबाबतची तिची इच्छा व्यक्त होताच संबंधित बाबांनी त्याला विरोध केला आणि तिच्या कुटुंबीयांनाही तिच्याविषयी नकारात्मक माहिती दिली. पुढे एका प्रसंगी पेय दिल्यानंतर स्वतःवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेनंतर वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचे तसेच धमक्या देण्यात आल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे. आपल्या विरोधात कोणी विश्वास ठेवणार नाही, अशी भीती दाखवत आरोपीने दीर्घकाळ आपल्यावर नियंत्रण ठेवले, असा दावाही महिलेने केला आहे.

हेही वाचा : नर्तकीला बघताच तरुणांची नियत बिघडली, स्टेजवरून ओढत निर्जनस्थळी नेलं अन्..

हे वाचलं का?