सुप्रिया सुळे यांचे जावई आहेत तरी कोण? पक्षीय बंधन तोडून रेवती सुळे थाटणार संसार
Who Is Sarang Lakhani : सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांनी सारंग लखानी यांच्यासोबत संसार थाटला. रेवती सुळे या सुप्रिया सुळे यांच्या कन्या असल्याचं अवघ्या देशाला ठाऊक आहे, सारंग लखानी हे रेवती सुळे यांचे पती असून त्यांच्याबाबत लोकांना अधिकची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कोण आहेत सारंग लखानी?
लग्नसोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती
Who Is Sarang Lakhani : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लेकीचा विवाह नुकताच पार पडला. या विवाहाला देशभरातून दिग्गजांनी हजेरी लावली होती. अगदी बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान यांच्यासह इतर दिग्गजांनी देखील उपस्थिती दर्शवली होती. त्यांच्या लग्नाची देशभर चर्चा होऊ लागली. अगदी राहुल गांधींपासून ते उद्योगपती अदानी आणि अंबानी यांनी आपली उपस्थिती दर्शवली,यामुळे हा विवाह चर्चेचा विषय ठरला. विवाहानंतर रेवती सुळे यांचे पती सारंग लखानी नेमकं काय करतात आणि त्यांच्या वडिलांचं भाजपशी नेमकं काय खास कनेक्शन आहे? त्यांचा विवाह कसा जुळला? याची अनेकांना उत्सुकता लागलेली होती.
हे ही वाचा : नवरा कामावर गेला, घरात बायको आणि प्रियकर एकत्रच अन्..
रेवती सुळे इकॉनॉमिक्सच्या माजी विद्यार्थिनी
रेवती सुळे या सुप्रिया सुळे यांच्यामुळे अधिक चर्चेत आलेल्या होत्या, त्यांनी बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा प्रचार देखील केला होता. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या माजी विद्यार्थिनी अशी त्यांची ओळख आहे. मात्र, पती सारंग लखानीबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. सारंग केवळ एका घराण्याचे वारसदारच नाही,तर त्यांची एक स्वतंत्र वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
कोण आहेत सारंग लखानी?
सारंग लखानी हे उच्च शिक्षित असून त्यांनी 2014 मध्ये नागपूर विद्यापीठातून बी-कॉममधून पदवी घेतली होती. आयआयएम बंगळुरूमधून व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले. मे 2023 या वर्षात त्यांनी अमेरिकेतील नामांकित कोलंबिया बिझनेस स्कूलमधून एमबीएचे शिक्षण घेतले. तसेच ते आता 'विश्वराज ग्रुप'मध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी मॉडर्न हायड्रोजन कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंट कन्सलटंट म्हणून काम केलं होतं. तसेच सारंग हे उत्तम बॅडमिंटनपटू देखील आहेत, याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे.
हे ही वाचा : पुणे : भुयारी मार्ग, उच्चभ्रू महिलांशी शारीरिक संबंध, कंडोम्स अन् गोळ्या
लग्नसोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती
लग्नसोहळ्याला अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी, उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिनेता शाहरुख खान, अभिनेते जॅकी श्रॉफ, पीयूष गोयल, मल्लिकार्जून खर्गे, भगवंत मान, असदुद्दीन ओवैसी आणि एरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती.









