पालघर हादरले! घरात एकट्या राहणाऱ्या महिलेची हत्या; नेमकं काय घडलं?
Palghar Murder Case : पालघरच्या वजलीपाडा परिसरात घरात एकट्या राहणाऱ्या 61 वर्षीय शोभा पंडित यांची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीच्या संशयासह सीसीटीव्ही फुटेज आणि घरातील रंगकामाच्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पालघर हादरले! घरात एकट्या राहणाऱ्या महिलेची हत्या;
नेमकं काय घडलं?
Palghar Murder Case , पालघर : पालघर शहरातील वजलीपाडा परिसरात घरात एकट्या राहणाऱ्या 61 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची घटना रविवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. शोभा अनिल पंडित असे मृत महिलेचे नाव आहे. वजलीपाडा येथील तुळसी दर्शन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या राहत्या घरातील बेडरूममध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. घरातील कपाट उघडे असल्याने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करून महिलेची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा : "मी भारतीय नागरीक आहे अन् राहणार", ध्रुव राठीने पासपोर्ट दाखवत शेअर केला VIDEO
बेडरूममध्ये शोभा पंडित मृतावस्थेत आढळून आल्या
शोभा पंडित या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या नेहमीच्या दिनक्रमानुसार घराच्या दरवाजाबाहेर ठेवलेला दिवा त्या सकाळी घरात घेत असत. मात्र, घटनेच्या दिवशी दिवा बाहेरच असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. घरातील दिवे सुरू होते आणि पंखे सुरू असल्याचा आवाजही येत होता. नेहमीच्या दिनक्रमात झालेला बदल लक्षात आल्याने शेजाऱ्यांना संशय आला.त्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या दुसऱ्या चावीच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी बेडरूममध्ये शोभा पंडित मृतावस्थेत आढळून आल्या. घरातील कपाटही उघडे असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.
हेही वाचा : मोठी बातमी : अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुटका, न्यायालयात काय घडलं?
