"मी भारतीय नागरीक आहे अन् राहणार", ध्रुव राठीने पासपोर्ट दाखवत शेअर केला VIDEO
Dhruv Rathee first reaction after released by police : ध्रुव राठीची दिल्ली पोलिसांकडून पहाटे तीन वाजता सुटका करण्यात आली. सुटकेनंतर व्हिडीओ शेअर करत त्याने कारवाईबाबत आरोप केले आणि केंद्र सरकारवर टीका केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"मी भारतीय नागरीक आहे अन् राहणार"
ध्रुव राठीने पासपोर्ट दाखवत शेअर केला VIDEO
Dhruv Rathee first reaction after released by police : सीजेपीच्या आंदोलनासाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत असलेल्या यूट्यूबर ध्रुव राठीला पोलिसांनी शनिवारी (दि.10) सकाळी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी रविवारी (दि.11) पहाटे तीन वाजता त्याची सुटका केली. जंतर-मंतरवर येण्याचा प्रयत्न केल्यास पुन्हा कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला. सुटकेनंतर ध्रुव राठीने एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये त्याने स्वतःसोबत घडलेल्या घटनांबाबत भाष्य केलं आहे. तसेच, आपल्याला ताब्यात घेण्याच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत त्याने केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
हेही वाचा : सोन्यासारखी मुलगी जन्माला आली, पण आईवडिलांना नकोशी झाली; दोनच दिवसात केली भयंकर हत्या
परदेशी पासपोर्टधारक असल्याच्या चर्चा खोट्या- ध्रुव राठी
ध्रुव राठीने व्हिडीओच्या सुरुवातीला गेल्या 24 तासांत पाठिंबा दिलेल्या लोकांचे आभार मानले. त्यानंतर त्याने भारतीय नागरिकत्वाबाबत स्पष्टीकरण दिलं. आपल्याकडे भारतीय पासपोर्ट असून आपण भारतीय नागरिक आहोत आणि कायम राहणार आहोत, असं त्याने सांगितलं. आपण परदेशी पासपोर्टधारक असल्यामुळे आंदोलनात सहभागी होऊ शकत नसल्याच्या चर्चा खोट्या असल्याचा दावाही त्याने केला. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास आपण घरात झोपलेलो असताना साध्या कपड्यांतील सुमारे 20 जण घरात घुसल्याचा आरोप त्याने केला. त्यावेळी घरात आई-वडील आणि आपण असे तिघेच होतो, असंही त्याने सांगितलं. हे लोक थेट आपल्या बेडरूममध्ये आले आणि प्रतिक्रिया देण्याची संधी न देता आपल्याला बाहेर घेऊन गेले, असा दावा त्याने केला.
