मोठी बातमी : अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुटका, न्यायालयात काय घडलं?

मुंबई तक

CJP Delhi Protest : काही वेळापूर्वी अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची न्यायालयाने सुटका केली आहे. शनिवारी सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

ADVERTISEMENT

CJP Delhi Protest
CJP Delhi Protest
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मोठी बातमी : अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुटका

point

न्यायालयात काय घडलं?

CJP Delhi Protest : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि पक्षाचे नेते सौरव दास व आशुतोष रांका यांना शनिवारी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर रविवारी या तिघांना दिल्लीतील एसीएम न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुटका केली आहे. शनिवारी झालेल्या कारवाईनंतर या तिघांना ताब्यात घेण्यात आल्याने पक्षाच्या आंदोलनाकडे लक्ष लागले होते. रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, पक्षाने आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका कायम ठेवली आहे.

निर्बंधांबाबत सर्वोच्च न्यायालयात रविवारी सुनावणी 

दुसरीकडे, शनिवारी दिल्लीमध्ये घालण्यात आलेल्या निर्बंधांबाबत सर्वोच्च न्यायालयात रविवारी सुनावणी होणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घालणे, मेट्रो आणि रेल्वेची वाहतूक रोखणे तसेच नागरिकांना ताब्यात घेणे, या मुद्द्यांवरून अवमानना याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे विशेष पीठ सुनावणी करणार आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलनासंदर्भातील या सुनावणीकडेही लक्ष लागले आहे. एका बाजूला जंतरमंतरवर आंदोलन सुरू ठेवण्याची तयारी आणि दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, अशा घडामोडी रविवारी दिल्लीत घडत आहेत.

दिल्लीतील जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीकडून रविवारी मोठ्या आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा पक्षाने केली आहे.

दिल्लीतील आंदोलनादरम्यान शनिवारी झालेल्या कारवाईनंतर रविवारी आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेते अंजिक्य शिंदे यांनी शनिवारी याबाबत घोषणा केली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली. या पार्श्वभूमीवर रविवारी जंतरमंतर परिसरात मोठ्या आंदोलनाची तयारी करण्यात येत आहे. आंदोलनामुळे मध्य दिल्ली, नवी दिल्ली आणि कनॉट प्लेस परिसरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल केले जाणार आहेत.