कोल्हापूर : प्रेयसीचं लग्न ठरलं, संतापलेल्या तरुणाने थेट कड्यावरुन ढकलून संपवलं

मुंबई तक

Kolhapur murder case : लग्न ठरल्यानंतर प्रेमसंबंध तोडल्याच्या कारणावरून तरुणीला नाईकवाडी येथील कड्यावरून ढकलल्याची घटना समोर आली आहे. आरोपी श्रीपाद वडू याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली.

ADVERTISEMENT

Kolhapur Murder Case
Kolhapur Murder Case
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर : प्रेयसीचं लग्न ठरलं

point

संतापलेल्या तरुणाने थेट कड्यावरुन ढकलून संपवलं

Kolhapur Murder Case : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात नाईकवाडी येथील कड्यावरून ढकलून 23 वर्षीय तरुणीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील 25 वर्षीय आरोपी श्रीपाद दिनकर वडू याने तरुणीच्या खुनाची कबुली दिली आहे. सुरुवातीला तरुणी बेपत्ता झाल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे भुदरगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : मोठी बातमी : अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुटका, न्यायालयात काय घडलं?

प्रेमसंबंध पुढे सुरू ठेवण्यास नकार दिल्याने केला खून 

गारगोटी येथील अवधूत कॉलनीमध्ये श्रीपाद दिनकर वडू आणि 23 वर्षीय तरन्नुम बशीर नाईक हे एकमेकांच्या घरासमोर राहत होते. त्यातून दोघांची ओळख झाली आणि पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. तरन्नुम ही महागाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. दरम्यान, तरन्नुमचे लग्न ठरले. त्यामुळे तिने श्रीपादसोबतचे प्रेमसंबंध पुढे सुरू ठेवण्यास नकार दिला. याच कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाले होते. तरन्नुमने प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतल्याने दोघांमधील वाद वाढल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : नात्यानं आजी लागणाऱ्या विधवा महिलेसोबत प्रेमविवाह, कुटुंबियांचा थरारक प्लॅन, तरुणाचा काढला काटा