पाचवीतील मुलीवर अॅसिड हल्ला, तो नराधम कोण ज्यानं केलं मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त?
sangamner acid attack : संगमनेरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील वडगाव पान येथे इयत्ता पाचवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात चिमुकलीचा चेहरा भाजून निघाला आहे. दुपारी शाळा सुटल्यानंतर चिमुकली शाळेतून घरी परतताना ही धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं परिसर हादरून गेलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
संगमनेरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार
पाचवीतील विद्यार्थीनीवर अॅसिड हल्ला
sangamner acid attack : रोहित वाळके - संगमनेरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील वडगाव पान येथे इयत्ता पाचवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात चिमुकलीचा चेहरा भाजून निघाला आहे. दुपारी शाळा सुटल्यानंतर चिमुकली शाळेतून घरी परतताना ही धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं परिसर हादरून गेलाय.
हे ही वाचा: LPG Gas Cylinder : घर बसल्या मिळवा सिलेंडर, रांग वैगरे लावायची नाही.. फक्त 'एकच' गोष्ट करा
पाचवीतील विद्यार्थीनीवर अॅसिड हल्ला
या हल्ल्यातील संबंधित विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. पीडितेला एका लोणी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. हल्ला करणारी व्यक्ती अज्ञात माथेफिरू असल्याचा संशय आहे. या घटनेनं आता महिलांसह चिमुरडींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
चिमुरडी वेदनेनं व्हिवळत होती
संबंधित मुलगी ही तालुक्यातील वडगाव पान येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होती. शाळा सुटल्यानंतर ती घरी जात असताना वाटेत दबा धरून बसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर अॅसिड हल्ला केला. पीडित चिमुरडी ही वेदनेनं व्हिवळत होती, त्याचदरम्यान आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
मुलीवर झालेल्या या क्रूर हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचं चित्र आहे. दरम्यान आरोपीला तात्काळपणे अटकेची मागणी सर्वत्र होताना दिसतेय. हल्लेखोराचा तपास करण्यासाठी पोलिसांचा शोध सुरुच आहे. पोलीस सीसीटीव्हीचा तपास करत आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.










